एकनाथ खडसेंचा भाजपला रामराम, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

एकनाथ खडसे यांच्या भाजपमधून जाण्यानं धक्का बसल्याचं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय.

एकनाथ खडसेंचा भाजपला रामराम, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

जालना : भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. यानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप निर्माण झालाय. यानंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहे. त्यातच आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त केलीय. एकनाथ खडसे यांच्या भाजपमधून जाण्यानं धक्का बसल्याचं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय (Pankaja Munde comment on resignation of Eknath Khadse from BJP).

पंकजा मुंडे म्हणाल्या, “कालच रात्री मी एकनाथ खडसे साहेबांनी पक्षात राहावं आणि ते राहतील असं स्टेटमेंट दिलं होतं. आज त्यांच्या राजीनाम्याची बातमी मी माध्यमांमधूनच ऐकली आहे. मी दिवसभर प्रवासात असल्याने याची बातमी मी काही पाहिलेली नाही. त्यामुळे मलाही धक्का बसला आहे.”

यावेळी पंकजा मुंडे यांनी एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यावर सविस्तर बोलणं टाळलं. तसेच देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदे घेणार आहेत. ते यावर सविस्तर बोलतील, अशी भूमिका मांडली.

‘भाजप कार्यकर्त्यांसाठी एकनाथ खडसेंचा राजीनामा धक्कादायक आणि मन विषण्ण करणारा’

दरम्यान, राज्याचे माजी मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील खडसेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “एकनाथ खडसे यांचा भाजप सोडण्याचा निर्णय माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी धक्कादायक आणि मन विषण्ण करणारा आहे. भाजप पक्ष वाढवण्यात एकनाथ खडसे यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे खडसे यांनी आपला निर्णय बदलावा, असे मला वाटते. राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये त्यांचे मन रमणार नाही.”

“पक्षात न्याय आणि अन्याय होत असतो. मात्र, हे प्रश्न चर्चेतून सुटू शकतात. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी कोणत्या विचाराने पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, हे मला कळत नाही. चार दिवसांपूर्वीच माझे त्यांच्याशी बोलणे झाले. त्यावरुन खडसे इतक्यात पक्ष सोडतील, असे मला वाटले नव्हते. मात्र, आज त्यांच्या राजीनाम्याची बातमी ऐकून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला धक्का बसला,” असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यांच्यासारख्या नेत्याने पक्ष सोडल्यामुळे भाजपच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची भीतीही यावेळी मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या :

EXCLUSIVE | एकनाथ खडसेंचं ठरलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश!

पक्ष सोडू नये म्हणून चंद्रकांत पाटलांशिवाय कुणाचाही फोन नाही; खडसेंचा गौप्यस्फोट

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर खासदार सूनबाई रक्षा खडसे म्हणतात…

एकवेळ मरण पत्करेन पण भाजप सोडणार नाही, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर प्रकाश मेहतांचा निर्धार

संबंधित व्हिडीओ :

Pankaja Munde comment on resignation of Eknath Khadse from BJP

Published On - 6:10 pm, Wed, 21 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI