माझ्या कार्यकर्त्याला मारहाण, हे खपवून घेतलं जाणार नाही, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर घणाघात

भाजपचं काम का करतोस? असा जाब विचारत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाटोदा तालुक्यातील रोहतवाडीच्या भाजप सरपंचाला मारहाण केली (Pankaja munde criticises dhananjay munde) आहे.

Pankaja munde criticises dhananjay munde, माझ्या कार्यकर्त्याला मारहाण, हे खपवून घेतलं जाणार नाही, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर घणाघात

बीड : भाजपचं काम का करतोस? असा जाब विचारत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाटोदा तालुक्यातील रोहतवाडीच्या भाजप सरपंचाला मारहाण केली (Pankaja munde criticises dhananjay munde) आहे. तर दुसरीकडे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविषयी फेसबुकवर वाईट शब्दात कमेंट केल्याने नागरगोजे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे बोललं जात आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या सहा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी ट्विट करत बीडचे पालकमंत्री आणि धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.

“बीड जिल्ह्यातील शांतता आणि सुख कायम राहावं असं पालकत्व कोणाचं ही मिळावं मग ते कोणीही असो अशी भावना होती. पण सूडाच्या आणि सत्तेच्या लालसेने ग्रासलेले लोक समाजात शांतता ठेऊ शकत नाही माझ्या कार्यकर्त्याला मारहाण, दबाव, दहशत हेच ध्येय दिसतंय पालकांचं. हे खपवून घेतलं जाणार नाही,” असे ट्विट पंकजा मुंडेंनी केलं आहे.

“सत्ता नाही तरी पुण्याई आहे आणि हिंमत ही आहे …सामाजिक न्याय करा अन्याय चालत नाही इथे !!!,” असेही आणखी एक ट्विट पंकजा मुंडेंनी केले आहे.

बीडमध्ये संध्याकाळच्या सुमारास भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. भाजपचं काम का करतोस? असा जाब विचारत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाटोदा तालुक्यातील रोहतवाडीच्या भाजप सरपंचाला मारहाण केली आहे. याप्रकरणी सरपंच पांडुरंग नागरगोजे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पाटोदा पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीच्या 6 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

“पाच वर्ष मी बीड जिल्ह्याची पालकमंत्री होते. कधीही पक्षभेद केला नाही. कोणत्याही गुंडागर्दीला कधीही थारा दिला नाही. सन्मानजनक वागणूक प्रत्येकाला देण्याचा प्रयत्न केला. याच शुभेच्छा मी पालकमंत्र्यांनाही दिल्या. मात्र माझ्या पक्षाच्या सरपंचाला मारहाण झाली. त्याने पक्षाची आपल्या नेत्याची भूमिका मांडली. अशाप्रकारची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. आम्ही सत्तेत नाही, याचा अर्थ आमचे हात बांधले असं नाही. आम्ही रस्त्यावर उतरुन न्याय मागू. त्यामुळे जी घटना घडली त्यावरुन असं दिसतं की काही लोकांना सत्तेचा उन्माद आला आहे. मुख्यमंत्री किंवा मोठ्या नेते या गोष्टींना खत घालणार नाहीत. एका व्यक्तीमुळे मी सर्व नेत्यांवर ताशेरे ओढू शकत नाही,” अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली

पांडुरंग नागरगोजे हे गेल्या 20 वर्षांपासून भाजपचे कार्यकर्ते आहेत. एकीकडे भाजपचं काम का करतो? असा जाब विचारत नागरगोजे यांना मारहाण झाल्याचं समोर येतं आहे. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्याविषयी फेसबुकवर वाईट शब्दात कमेंट केल्याने नागरगोजे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. मात्र नागरगोजे यांना नेमकी मारहाण कोणत्या कारणात्सव झाली हे अद्याप समोर आलेले (Pankaja munde criticises dhananjay munde) नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *