Pankaja Munde : “माझी पात्रता वाटत नसेल म्हणून मला मंत्रिपद दिलं नसेल”, रक्षाबंधनावेळी पंकजा मुंडेंची नाराजी उघड

वरीष्ठ नेत्यांना माझी पात्रता वाटत नसेल म्हणून मला मंत्रीपद दिलं नसेल असा थेट टोला त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना लगावला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातला राजकारण तापण्याची शक्यता आहे. तसेच पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते ृही आक्रमक होण्याची दाट शक्यता आहे.

Pankaja Munde : माझी पात्रता वाटत नसेल म्हणून मला मंत्रिपद दिलं नसेल, रक्षाबंधनावेळी पंकजा मुंडेंची नाराजी उघड
"माझी पत्रता वाटत नसेल म्हणून मला मंत्रिपद दिलं नसेल", रक्षाबंधनावेळी पंकजा मुंडेंची नाराजी उघडImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 5:22 PM

मुंबई : चाळीस दिवसानंतर राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) पार पडला. यात तब्बल 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र या नव्या अठरा मंत्र्यांमध्ये कुठेही भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचं नाव आलं नाही. त्यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू होत्या. मात्र आज पंकजा मुंडे यांनी महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरं केलं. या रक्षाबंधनानंतर त्यांच्याशी बातचीत करताना त्यांनी त्यांची नाराजी उघडपणे जाहीर केली. वरीष्ठ नेत्यांना माझी पात्रता वाटत नसेल म्हणून मला मंत्रीपद दिलं नसेल असा थेट टोला त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना लगावला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातला राजकारण तापण्याची शक्यता आहे. तसेच पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते ृही आक्रमक होण्याची दाट शक्यता आहे.

माझी पात्रता वाटत नसेल..

याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, ज्यावेळेस मंत्रिमंडळ बनत असतं त्यावेळेस सर्वांना समाधानी करणं शक्य नसतं. त्यामुळे जे मंत्री झाले त्यांनी तरी लोकांचा समाधान करावं अशा शुभेच्छा मी नव्या मंत्र्यांना देऊन झालेली आहेत. तसेच मी चर्चेत राहणारच नाव आहे, मात्र अजून त्यांना माझी पात्रता वाटत नसेल, त्यामुळे मला मंत्रीपद दिलं नसेल, जेव्हा त्यांना माझी पात्रता वाटेल तेव्हा देतीलही कदाचित, त्याबद्दल मला काही अपक्षेप नाही, या चर्चा मीडियातून होतात आणि कार्यकर्त्यातून होतात अशी प्रतिक्रिया यावेळी पंकजा मुंडे यांनी मंत्रीपदावरती दिलेली आहे.

मंत्रिमंडळात महिला असल्याच पाहिजेत

तसेच नव्या मंत्रिमंडळात महिला या असल्याच पाहिजेत, माझं सांगणं आहे की महिला म्हणजे महिला बालकल्याण, एखादा मुस्लिम बांधव म्हणजे, अल्पसंख्यांक, आदिवासी भागातून म्हटल्यावर आदिवासी विकास, शेड्युल कास्ट म्हणजे शेड्युल कास्ट खातं असं करू नये, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. तसेच मला कौतुक वाटतं की मागच्या मंत्रिमंडळात मी महिला असूनही मला ग्रामविकास खातं मिळालं होतं. अशा रितीनेच महिलांना संधी दिली पाहिजे, अशी अपेक्षा मी या मंत्रिमंडळाकडून व्यक्त करते, असे त्या म्हणाले आहेत.

पंकजा मुंडेंना अनेकदा डावललं

गेल्या विधानसभेला परळी विधानसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांची कुठेतरी वर्णे लावण्यात येईल, अशा चर्चा सुरू होत्या. मात्र गेल्या अडीच तीन वर्षात पंकजा मुंडे यांना सतत भाजपच्या नेतृत्वाकडून डावलण्यात आलेलं आहे. अलीकडे स्वतः राज्यसभेच्या निवडणुका लागल्या त्यावेळेस राज्यसभेवरती पंकजा मुंडे यांना पाठवतात की काय अशा चर्चा सुरू होत्या. मात्र राज्यसभेवरतीही त्यांची निवड झाली नाही. त्यानंतर त्याचपाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या विधान परिषदेवर पंकजा मुंडे यांची वर्णी लागणार अशा चर्चाही दबक्या आवाजात सुरू झाल्या मात्र या चर्चही तेवढ्याच वेगाने दबल्या.

कार्यकर्तेही अनेकदा आक्रमक

त्यानंतर पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांची नाराजी उघडपणे बाहेर आली होती. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली होती. तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात थेट घोषणाबाजी करण्यात आली होते. औरंगाबाद येथे एका कार्यकर्त्याने थेट आत्मदहनाचाच प्रयत्न केला होता. त्यामुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्या या विधानानं राजकारण ढवळून निघण्याची दाट शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.