मराठवाड्यातील बैठकांना उपस्थित राहणार नाही, हे आधीच सांगितलं होतं; पंकजा मुंडेंचं ट्विट!

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बीडमध्ये आलेले असताना त्यांच्या दौऱ्याकडे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पाठ फिरवल्यामुळे त्या नाराज असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. त्यावर पंकजा मुंडे यांनी ट्विट केलं आहे.

मराठवाड्यातील बैठकांना उपस्थित राहणार नाही, हे आधीच सांगितलं होतं; पंकजा मुंडेंचं ट्विट!
Follow us
| Updated on: Nov 09, 2020 | 10:21 PM

बीड : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जिल्ह्यात आलेले असताना त्यांच्या दौऱ्याकडे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पाठ फिरवल्यामुळे त्या नाराज असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. त्यावर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत आपण मराठवाडयातील बैठकांना उपस्थित राहू शकत नाही, असे या आधीच सांगितले होते, असे स्पष्टीकरण देत पंकजा मुंडे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. (Pankaja Munde said that already told to Chandrakant Patil that will not attend meetings)

“चंद्रकांत पाटील आणि माझी दोन दिवसांपूर्वीच भेट झाली होती. ते माझ्या घरी नाश्ता करण्यासाठी आले होते. आमच्या छान गप्पाही झाल्या. यावेळी आमच्यात सविस्तर चर्चा झाली. यावेळी मराठवाडयातील बैठकांना उपस्थित राहू शकत नाही, याबद्दलही माझे त्यांच्याशी बोलणे झाले. ही संघटनेची आढावा बैठक होती, त्यापूर्वीच्या संध्याकाळी मी कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थित होते.” असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत मराठवाड्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र जोरात सुरू आहे. औरंगाबाद दौर्‍यानंतर चंद्रकांत पाटील थेट बीड जिल्ह्यात पोहोचले. येथे आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचे जंगी स्वागत केलं. भव्यदिव्य असा सत्कारही केला. पण यावेळी पंकजा मुंडे उपस्थित नव्हत्या. चंद्रकांत पाटील यांनी आयोजित केलेल्या बैठकीला पंकजा मुंडे राहतील असं वाटलं होतं; मात्र काही कामानिमित्त त्या अनुपस्थित आहेत, अशी माहिती बीडचे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली होती.

चंद्रकांत पाटलांच्या या दौऱ्यावेळी पंकजा उपस्थित राहील्या नसल्याने त्या नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यावर औरंगाबाद येथे पत्रकारांशी संवाद साधताना पंकजा नाराज नाहीत, असं त्यांनी सांगितलं. बैठकीला येऊ शकणार नसल्याचं त्यांनी मला मेसेज करून कळवलं होतं. हवं तर तुम्ही त्यांना फोन करून विचारू शकता, असं पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. त्यांनतर पंकजा यांनी ट्विट करत मी उपस्थित राहू शकणार नाही हे चंद्रकांत पाटलांना आधीच सांगितलं होतं, असं स्पष्टीकरण देऊन त्यांच्या नाराज असण्याच्या अफवांमधील हवा काढून घेतली आहे.

संबंधित बातम्या :

पंकजा मुंडेंना पुन्हा शिवसेनाप्रवेशाचे आमंत्रण, सेना खासदार उद्धव ठाकरेंना भेटणार

पंकजा मुंडेंना होमग्राऊण्डवर धक्का, भाजपकडील माजलगाव नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात

Special Report | राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंना डावललं जातंय?

(Pankaja Munde said that already told to Chandrakant Patil that will not attend meetings)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.