बीड जिल्ह्यात मुलींचा जन्म नाकारला जातोय, कुणाचा वचक राहिला नाही, पंकजा मुंडे यांचा रोख कुणाकडे?
राज्याच्या माजी महिला व बालकल्याण विकास मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी बीड (Beed) जिल्ह्यातील घटलेल्या मुलींच्या (Girl Child Birth Rate) जन्मदरावरुन भाष्य केलं आहे.

बीड : राज्याच्या माजी महिला व बालकल्याण विकास मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी बीड (Beed) जिल्ह्यातील घटलेल्या मुलींच्या (Girl Child Birth Rate) जन्मदरावरुन भाष्य केलं आहे. पुन्हा एकदा मुलींच्या जन्मासाठी प्रबोधन, जनजागृतीची गरज असून प्रबोधन आणि जागरण सुरू करुया, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे. 2009 राज्यात मुलींचा जन्मदर सर्वात कमी होता. त्यावेळी मी सुरुवातीला एनजीओच्या माध्यमातून आणि नंतर पालकमंत्री म्हणून खूप काम केले होते. पहिली योजना मुलींचा जन्मदरवाढवण्यासाठी योजन सुरू केली त्यामुळे बीडमध्ये 1000 मुलांमागे 961 मुलींची संख्याा वाढली होती. आता जिल्हयात पूर्वीसारखीच स्थिती निर्माण झालीय, या प्रकारावर पंकजा मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आताच्या कारभारावर कुणाचाही वचक, अंकुश राहिला नाही, अशा शब्दात धनंजय मुंडे यांचं नाव न घेता पंकजा मुंडे यांनी टोला लगावला आहे.पहिल्यासारखी स्थिती निर्माण करण्यासाठी प्रबोधन, जनजागृती करण्याची गरज असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.
पाहा व्हिडीओ
पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
बीड जिल्ह्यामध्ये 2009 साली जेव्हा मी राजकारणात आले तेव्हा मुलींचा जन्मदर हा राज्यातला सर्वात कमी जन्मदर होता. या गोष्टीमुळं मनामध्ये खूप तीव्र दुःख होऊन एनजीओच्या माध्यमातून मी काम केलं. पालक मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि महिला बालकल्याण विभागाचा कार्यभार माझ्याकडे आला तेव्हा पहिली योजना मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी डिक्लेअर केली. त्या कामाचा परिणाम असा झाला की बीड जिल्ह्यामध्ये मुलींचा जन्मदर वाढला होता. बीड जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर हजार मुलांमागे 961 इतका झाला होता.
बीड जिल्ह्याचं चित्र बदलुया
आता हे प्रमाण ज्या ठिकाणाहून सुरू झालं होतं त्याच ठिकाणी परत गेलं आहे. हे काम आताच्या या कारभारामुळे झालेलं आहे. त्यांचा मी तीव्र निषेध व्यक्त करते, तीव्र नापसंती व्यक्त करते आणि मनापासून दुःख व्यक्त करते. बीड जिल्ह्यात पीसीपीएनडी अॅक्टचा वापर होत नाहीय. बीड जिल्ह्यामध्ये मुलींचा जन्मदर कमी झाल्याचे दिसून येत आहे आणि याचा अर्थ असा आहे की मुलींचा जन्मदर नाकारला जात आहे. कुठेतरी अशा प्रकारच्या घटना घडत आहेत आणि त्यामध्ये याच्यावर कोणाचाही वचक आणि अंकुश राहिलेला नाही. मी याचा तीव्र निषेध करते. पंकजा मुंडे यांनी माझ्या बीड जिल्हा वासियांना बेटी बचाव बेटी पढाव या योजनेला खूप छान प्रतिसाद देण्याचं आवाहन केलं. बेटी बचाव बेटी पढाव योजनेत प्रबोधन, जागरण, जागृती करण्याची गरज आहे. त्याबद्दल सर्वांनी भाग घ्या, हे बीड जिल्ह्याचे चित्र कधी आपल्याला दिसले नाही पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
इतर बातम्या:
1995 पासून नवी मुंबईतील लोकांचा कौल आम्हालाच, आताही आमचीच सत्ता येणार: आमदार गणेश नाईक
