AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MP Sanjay Jadhav : शिवसेनेला धक्का! परभणीचे खासदार संजय जाधव शिंदे गटात दाखल? पंढरपुरात महापूजेला हजेरी

यापूर्वी एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे, खासदार भावना गवळी आणि आता खासदार संजय शिंदे हे देखील एकनाथ शिंदे गटात दाखल झाल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, हा केवळ योगायोग असल्याची माहिती जाधव यांच्याकडून समोर येत आहे.

MP Sanjay Jadhav : शिवसेनेला धक्का! परभणीचे खासदार संजय जाधव शिंदे गटात दाखल? पंढरपुरात महापूजेला हजेरी
संजय जाधव/उद्धव ठाकरेImage Credit source: tv9
| Edited By: Shubham Kulkarni | Updated on: Jul 10, 2022 | 9:22 AM
Share

मुंबई : शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या गटानं वेगळी वाट धरली तरी देखील शिवसेनेतील गळती कमी झाल्याचं दिसत नाही. आता आमदारांनंतर खासदारही एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल होत असल्याचं दिसतंय. परभणीचे शिवसेना (Shivsena) खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात दाखल झाल्याची सूत्रांची माहिती आहे. पंढरपूरात शासकीय महापूजेला त्यांनी हजेरी लावली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीआधी शिवसेनेचे खासदार शिंदे गटात दाखल होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. संजय जाधवांनी महापुजेला हजेरी लावल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंदिरात संजय जाधवांचा सत्कार केला. शिवसेनेत आमदारांपाठोपाठ आता खासदारांचही बंड होणार असल्याचं दिसतंय. यापूर्वी एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे, खासदार भावना गवळी आणि आता खासदार संजय शिंदे हे देखील एकनाथ शिंदे गटात दाखल झाल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, हा केवळ योगायोग असल्याची माहिती जाधव यांच्याकडून समोर येत आहे.

संजय जाधव यांची यापूर्वी नेतृत्वावर टीका

यापूर्वी देखील शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळून आल्याचा प्रकार समोर आला होता. शिवसेना पक्षातील नेत्यानं खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असूनही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद मिळत नाही, असा हल्लाबोल त्यावेळी संजय जाधव यांनी केला होता. एकीकडे शिवसेनेला काहीही मिळत नाही, तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मात्र सर्व दिले जाते. शिवसेनेला डावलले जाते, असा आरोप त्यावेळी संजय जाधव यांनी केला होता. आधी भाजपाकडून विरोध झाला. आता मात्र आमचे मित्रपक्षच आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं वक्तव्य त्यावेळी संजय जाधव यांनी केलं होतं.

‘जायचे त्यांनी जावे’

एकनाथ शिंदेंसोबत एक एक करत जवळपास 39 शिवसेना आमदार गेले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी ज्यांना जायचे त्यांनी आत्ताच जावे, असा इशारा काठावरच्या शिवसैनिकांना दिला होता. स्थानिका पातळीवरदेखील आता दोन गट पडले असून सत्ता हवी असणारे एकनाथ शिंदे यांच्याबाजूने जात असल्याचे दिसत आहे. केवळ आमदारच नाही, तर पक्षात विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या कार्यकर्त्यांमध्येदेखील चलबिचल पाहायला मिळत आहे. यात एकनाथ शिंदेंना सहकार्य करणाऱ्या नेते आणि कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.

आमदारांनंतर खासदारांची गळती

संजय जाधवांनी महापुजेला हजेरी लावल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंदिरात संजय जाधवांचा सत्कार केला. शिवसेनेत आमदारांपाठोपाठ आता खासदारांचही बंड होणार असल्याचं दिसतंय. यापूर्वी एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे, खासदार भावना गवळी आणि आता खासदार संजय शिंदे हे देखील एकनाथ शिंदे गटात दाखल झाल्याची माहिती आहे.

Follow Us
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य