पार्थ पवार यांनी दूर केली शरद पवार यांची नाराजी? बारामतीमधील बैठकीनंतर थेट सुनेत्रा पवार यांना फोन आणि…
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. मात्र, त्यापूर्वी बारामतीमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचे मोठे नुकसान झाले. अजित पवार यांना अर्थखात्याचा मोठा अनुभव होता आणि राज्य कसे चालवायचे हे त्यांना माहिती होते. मुंबईहून बारामतीकडे निघाल्यावर बारामती विमानतळाच्या अगदी जवळ अजित पवार यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला. अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंबिय एकत्र दिले. मात्र, अजित पवार यांच्या निधनाला काही तास झालेले असतानाच पवार कुटुंबातील वाद पुढे आला. काल रात्री उशिरा सुनेत्रा पवार मुलगा पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासोबत मुंबईत आल्या. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाचा शपथ घेणार आहेत. हा शपथविधी 5 वाजता आहे. पण त्यापूर्वी घडामोडींना प्रचंड वेग आला. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची आपल्याला कोणतीही माहिती नाही, असे स्पष्ट शब्दात शरद पवार यांनी सांगितले.
सुनेत्रा पवार शपथ घेणार की नाही, हे मला माहिती नाही. त्यांची आणि माझी कोणतीही चर्चा झाली नाही. शरद पवार यांच्या या खुलाशानंतर अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार मुंबईहून थेट बारामतीला शरद पवार यांच्या भेटीला पोहोचला. सुनेत्रा पवार यांच्याबद्दल शरद पवार यांनी केलेल्या विधानानंतर पार्थ पवार सुनेत्रा पवार यांचा निरोप घेऊन बारामतीला गेल्याचे सांगितले जाते.
पार्थ पवार यांची शरद पवार यांच्यासोबत जवळपास 1 तास चर्चा झाली. यावेळी रोहित पवार आणि सुप्रिया सुळे हे देखील उपस्थित असल्याचे सांगितले जाते. शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पार्थ पवार बाहेर आले असून ते आई सुनेत्रा पवार यांच्यासोबत फोनवर चर्चा करत असल्याचे बघायला मिळतंय. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला पवार कुटुंबियांपैकी कोणी हजेरी लावणार का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, दोन्ही पक्ष एकत्र येणार होते आणि त्याबाबतची चर्चा देखील झाली होती. 12 फेब्रुवारी रोजी घोषणा केली जाणार होती. आज पार्थ पवार नेमके काय बोलणार आणि बैठकीत नक्की काय घडणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. शिवाय दुसरीकडे सुनेत्रा पवार यांची देवगिरी बंगल्यावर प्रमुख नेत्यांसोबत बैठक सुरू आहे.
