Eknath Shinde vs Shivsena : उपाध्यक्षांच्या निर्णयाविरोधात याचिका, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू, शिंदे गटाच्या युक्तीवादातील 10 मुद्दे जाणून घ्या…

उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी 16 आमदारांना नोटीस बजावत दोन दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले होते. आमदार निलंबन आणि गटनेता कारवाईविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. त्यावरच आता सुनावणी सुरू आहे.

Eknath Shinde vs Shivsena : उपाध्यक्षांच्या निर्णयाविरोधात याचिका, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू, शिंदे गटाच्या युक्तीवादातील 10 मुद्दे जाणून घ्या...
शिंदे विरुद्ध ठाकरेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 2:58 PM

मुंबई :  आजचा दिवस एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेसाठी महत्वाचा मानला जातोय. महाराष्ट्रातील राजकीय राडा सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचला असून अवघ्या देशाच्या नजरा महाराष्ट्रावर लागल्या आहेत. कोर्टात सुनावणी सुरु असल्यानं एकनाथ शिंदे गटासाठी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा मानला जातोय. 16 आमदारांच्या निलंबन नोटिसीविरोधात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. त्याबाबत आज सुनावणी सुरू आहे.  एकनाथ शिंदे गटाला कमकुवत करण्यासाठी शिवसेनेकडून 16 आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आलीय. त्याबाबत 16 पिटिशनही सादर करण्यात आलेत. त्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी त्या 16 आमदारांना नोटीस बजावत दोन दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. आमदार निलंबन आणि गटनेता कारवाईविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. त्यावरच आता सुनावणी सुरू आहे. वकील निरज किशन कौल हे शिंदे गटाकडून युक्तीवाद करतायत. जाणून घ्या शिंदे गटाकडून करण्यात आलेला युक्तीवाद….

  1.  उपाध्यक्ष झिरवळ यांच्या 16 आमदारांच्या निलंबनाच्या नोटीसीवर दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद सुरू आहे. यावेळी वकील निरज किशन कौल हे शिंदे गटाकडून युक्तीवाद करतायत.  त्यांनी म्हटलंय की, विधानसभेचं बहुमत उपाध्यक्षांसोबत असणं गरजेचं आहे. तरंच ते अधिकार वापरू शकतात.
  2. पुढे वकील निरज किशन कौल म्हणतात की उपाध्यक्ष झिरवळ यांच्यावर दोन अपक्षांनी अविश्वास ठराव ठेवला आहे. यामुळे उपाध्यक्ष यांच्यावर अविश्वासाचा ठराव असताना ते नोटीस काढू शकत नाही. असा युक्तीवाद  कौल यांनी केलाय.
  3. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडून सत्तेचा आणि प्रशासनाचा गैरवापर सुरू आहे. असं देखील कौल यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर म्हटलंय. यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांचाही उल्लेख केला आहे.
  4. कौल यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याचंही म्हटलंय. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असताना हे निर्णय घेतले जात असल्याचंही त्यांनी यावेळी सर्वेच्च न्यायालयात सांगितलं.
  5. कौल यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून बाजून मांडताना अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. यावेळी कौल यांनी अरुणाचल प्रदेशातील केसचा देखील दाखला दिला आहे.
  6. हायकोर्टात तुम्ही का गेले नाही, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. असाच प्रश्न महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या वकिलांकडून देखील करण्यात आलाय. या प्रश्नाचं उत्तर मात्र कौल यांनी दिलं नाही.
  7. शिंदे गटाकडून बाजू मांडताना कौल यांनी उपाध्यक्षांच्या अधिकारावर बोट ठेवलंय. उपाध्यक्षांनी बहुमत सिद्ध करावं मग त्यांना अधिकार पुन्हा मिळू शकतात, असं ते म्हणालेत.
  8. शिवसेना नेते संजय राऊतांचाही कौल यांनी यावेळी उल्लेख केला. तर राज्य सरकारच्या कारभारावर बोट ठेवत कौल यांनी सर्वोच्च न्यायालयात माहिती दिली आहे.
  9. गुवाहाटीवरुन प्रेत येतील, असं बोललं जातं, असं शिंदे गटाच्या वकिल कौल यांनी सांगितंलय. यावेळी त्यांनी शिवसेना नेत्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचाही उल्लेख केलाय.
  10. उपाध्यक्षांवर अविश्वास ठराव असल्यानं त्यांनी बंडखोर आमदारांच्या निलंबनाची बजावलेली नोटीस ही पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचं कौल यांनी म्हटंलय.
Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.