शिफारस केलेल्या व्यक्तींची नावं सादर करा; राज्यपाल नियुक्त संभाव्य सदस्यांविरोधात कोर्टात याचिका

| Updated on: Nov 04, 2020 | 10:30 PM

विधानपरिषदेतील 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्यांवरुन आरोप-प्रत्यारोप होत असताना याच नियुक्त्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. कायद्याचे उल्लंघन करून नियुक्त्या होत असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.

शिफारस केलेल्या व्यक्तींची नावं सादर करा; राज्यपाल नियुक्त संभाव्य सदस्यांविरोधात कोर्टात याचिका
Follow us on

मुंबई : विधानपरिषदेतील 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्यांवरुन आरोप-प्रत्यारोप होत असताना याच नियुक्त्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. कायद्याचे उल्लंघन करून नियुक्त्या होत असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. तसेच, शिफारस केलेल्या प्रस्तावित आमदारांची नावं जाहीर करण्याची मागणीदेखील याचिकाकर्त्यांनी केली आहे. लातूरचे सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव आगळे आणि सांगलीचे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी हिंदुराव पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यांची बाजू अ‌ॅड. सतीश तळेकर मांडणार आहेत. या याचिकेवर उद्या (5 नोव्हेंबर) सुनावणी होईल. (Petition in court against the MLA appointed by the Governor)

मागील काही दिवसांपासून विधानपरिषदेसाठी राज्यपाल नामनिर्देशित आमदारांच्या यादीवरुन विरोधक आणि सत्ताधराऱ्यांकडून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. राज्य सरकारने मागील आठवड्यात मंत्रिमंडळाची बैठक बोलावून 12 जणांच्या नावांचा ठराव मंजूर केला आहे. ही नावं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली जाणार आहेत. मात्र, या आधीच नावांच्या शिफारशींविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. कायद्याचे उल्लंघन करुन सदस्यांच्या नियुक्त्या होत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. तसेच, शिफारस केलेल्या व्यक्तिंची नावं हायकोर्टात सादर करण्याची मागणीदेखील याचिकार्त्यांनी केली आहे.

याचिकाकर्त्यांचे काय आरोप आहेत ?

याचिकेत प्रस्तावित नावांची यादी सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यपालांकडून केल्या जाणाऱ्या नियुक्त्यांबाबत काही कायदे आहेत. साहित्यिक, कलाकार, क्रीडा आदी वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंतांची नियुक्ती विधानपरिषदेत करावी असा नियम आहे. मात्र, या नियुक्त्यांमध्ये पक्षपात होत असल्याचा आरोप या याचिकेत केला आहे.

दरम्यान, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यपाल नामनिर्देशित आमदारांच्या प्रस्तावित नावाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून नकार दिला जाणार असल्याचा आरोप केला होता. तो आरोप फेटाळून लावत ‘हसन मुश्रीफांचा हा दावा पू्र्णपणे खोटा आहे. त्यांच्या या गावगप्पा आहेत. ग्रामविकास मंत्रिपदावर असणाऱ्या जबाबदार व्यक्तीने असं बोलू नये. मात्र, जे काम आपल्याला झेपत नाही त्याबद्दल अपप्रचार करण्याची राष्ट्रवादीची पद्धतच आहे,” अशी टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केली होती.

संबंधित बातम्या :

विधान परिषद : खडसे, बांदेकर ते सरदेसाई, तांबे; राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी 17 नावं चर्चेत

Anand Shinde | राजकारणातही ‘शिंदेशाही बाणा’, गायक आनंद शिंदे राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर?

उमेद संस्थेचे कर्मचारी भेटीला, राज ठाकरेंची थेट हसन मुश्रीफांशी चर्चा

(Petition in court against the MLA appointed by the Governor)