PCMC Election 2022: पिंपरी चिंचवड मनपाच्या प्रभाग क्र. 26 मध्ये पुन्हा भाजपची पुनरावृत्ती होणार की..; राष्ट्रवादी वेगळी गणितं मांडणार

| Updated on: Aug 19, 2022 | 5:44 PM

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 26 मध्ये मागील निवडणुकी सर्व जागांवर भाजपनेच विजय मिळवला होता. तर मात्र आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रभाग क्र. 26 चे आगामी काळातील होणाऱ्या निवडणुकीत या प्रभागाचे काय चित्र असणार हे काही दिवसातच स्पष्ट होईल.

PCMC Election 2022: पिंपरी चिंचवड मनपाच्या प्रभाग क्र. 26 मध्ये पुन्हा भाजपची पुनरावृत्ती होणार की..; राष्ट्रवादी वेगळी गणितं मांडणार
Follow us on

पुणेः महाराष्ट्रातील मोठ्या क्षेत्रफळाची महानगरपालिका म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे पाहिले जाते, त्यामुळे राज्यातील बड्या बड्या नेत्यांची आणि राजकीय पक्षांची नजरही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे (Pimpri Chinchwad Municipal Corporation Ward no. 3) असते. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे पाहिले जाते. मात्र सध्या राज्यातील राजकीय परिस्थितीचा विचार करता आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय चित्र वेगळे दिसण्याची शक्यता आहे. शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी करुन भाजपसोबत गेलेल्या शिंदे गटामुळे राज्यात सत्तांतर घडून आले आहे, त्यामुळे या परिस्थितीचा आगामी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांवर काय परिणाम होणार हे आता थोड्याच दिवसात समजणार आहे. प्रभाग क्र. 25 मध्ये ज्या प्रमाणे 3 शिवसेना तर 1 जागा राष्ट्रवादीला (Nationalist Congress) मिळाली होती, तर प्रभाग क्र. 26 मध्ये मात्र सर्व जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळविला होता. त्यामुळे येत्या निवडणुकीत या प्रभागावर कोणाचा वरचष्मा राहणार हे आता निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.

आरक्षणाचा फायदा-तोटा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 26 मध्ये मागील निवडणुकी सर्व जागांवर भाजपनेच विजय मिळवला होता. तर मात्र आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रभाग क्र. 26 चे आगामी काळातील होणाऱ्या निवडणुकीत या प्रभागाचे काय चित्र असणार हे काही दिवसातच स्पष्ट होईल. सध्या आरक्षणामुळे या प्रभागामध्ये सर्वसाधारण महिला तर दोन जागा सर्वसाधारण गटाला गेल्या आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत आरक्षणाचा भाजपला फायदा होणार की तोटा होणार हे थोड्याच दिवसात स्पष्ट होईल.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
राष्ट्रवादी
काँग्रेस
शिवसेना
भाजप
मनसे
अपक्ष

वॉर्ड कुठूनपासून कुठपर्यंत

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये बिजलीनगर, दळवी नगर, भोईर नगर, इंदिरानगर, चिंचवड नगर हा परिसर येतो. या प्रभागातील उत्तर भागात आकुर्डी. चिखली. स्पाईन रोड पासून पूर्वेस बिजलीनगर रस्त्याने ओम चौक बिजलीनगर पर्यंत व ओम चौकातून उत्तरेस अश्विनी हॉस्पिटल लगतच्या रस्त्याने रेल्वे लाईन पर्यंत व तिथून पूर्वेकडे रेल्वे लाईनने काही सोपानराव भोईर रेल्वे पुलापर्यंत आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
राष्ट्रवादी
काँग्रेस
शिवसेना
भाजप
मनसे
अपक्ष

तर पूर्व भागात काही सोपानराव भोईर रेल्वे पुलापासून दक्षिणेस दळवी नगर चिंचवड रस्त्याने नक्षत्र हाउसिंग सोसायटी व साई कॅपेपर्यंत व तिथून प्रेम लोक पारकर रस्त्याने पश्चिमेस बिजलीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या छत्रपती शिवाजी चौकापर्यंत व त्याच रस्त्याने दक्षिणेस चिंचवडे नगरकडे जाणाऱ्या चिंचवडे नगर, वाल्हेकर वाडी रस्त्यापर्यंत व त्याच रस्त्याने वाल्हेकर वाडी रस्त्याने पद्मजा हॉस्पिटल पर्यंत होती. तिथून पूर्वेस पत्तेचंद जैन कॉलेज लगतच्या सीमा भिंतीने चिंचवड जुना जकात नाक्यापर्यंत व तिथून दक्षिणेस डांगे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत त्याच रस्त्याने पवना नदीच्या थेरगाव चिंचवड पुलापर्यंत आहे, तर दक्षिण बाजूला पवना नदी असून पश्चिम भागात केजुदेवी बोट क्लब पवना नदीपासून उत्तरेस पंपिंग स्टेशन पासून हॉटेल वाघिरे रानमाळ्यापासून नाल्याने वाल्हेकर वाडी रस्त्यापर्यंत व तोच रस्ता ओलांडून आकुर्डी चिखली स्पाईन रस्त्यापर्यंत आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
राष्ट्रवादी
काँग्रेस
शिवसेना
भाजप
मनसे
अपक्ष