राम मंदिरासाठी ट्रस्टची स्थापना, 15 विश्वस्तांमध्ये अनुसूचित जातीच्या सदस्याला स्थान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आज राम मंदिरबाबत निवेदन दिलं. मोदी कॅबिनेटने आज राम मंदिर ट्रस्टला मंजुरी दिली आहे.

राम मंदिरासाठी ट्रस्टची स्थापना, 15 विश्वस्तांमध्ये अनुसूचित जातीच्या सदस्याला स्थान

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आज राम मंदिरबाबत निवेदन दिलं. मोदी कॅबिनेटने आज राम मंदिर ट्रस्टला मंजुरी दिली आहे. मंदिर उभारण्यासाठी जी ट्रस्ट स्थापन करण्यात आली आहे, त्या ट्रस्टला श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र (Sri Ram Janambhoomi Tirath Kshetra) असं नाव देण्यात आलं आहे. त्याबाबत निवेदन देताना मोदी म्हणाले, “श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट अयोध्येत भव्य-दिव्य श्रीराम मंदिर निर्माण आणि संबंधित विषयांवर निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र असेल” (Sri Ram Janambhoomi Tirath Kshetra)

मोदी म्हणाले, “मी माझ्या हृदयाजवळच्या विषयावर  बोलण्यासाठी इथे आहे. हा विषय म्हणजे अयोध्येतील राम मंदिर उभारण्याचा आहे. 9 नोव्हेंबरला मी जेव्हा करतारपूर कॉरिडोरसाठी पंजाबमध्ये होतो, तेव्हा मी राम मंदिराबाबतचा ऐतिहासिक निर्णय ऐकला”.

भारताच्या प्राणवायूत, आदर्शात सर्वत्र प्रभू श्रीराम आणि अयोध्येचं ऐतिहासिक महत्व आहे. अयोध्येत प्रभू रामाचं भव्य मंदिर आणि भविष्यात भाविकांची संख्या आणि श्रद्धा पाहता, सरकारने निर्णय घेतला आहे. अयोध्या कायद्यानुसार अधिगृहित सर्व जमीन 67 एकर ज्यामध्ये आत आणि बाहेरील अंगणाचा समावेश आहे, ती श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राला सोपवण्यात येईल असं मोदींनी सांगितलं.

आज आम्ही कॅबिनेटमध्ये महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार माझ्या सरकारने जन्मभूमीत राम मंदिर उभारण्यासाठी योजना तयार केली आहे. श्री राम मंदिर जन्मभूमी तीर्थ क्षेत्र स्थापन करण्यात येईल. ही ट्रस्ट पूर्णपणे स्वतंत्र असेल. सुप्रीम कोर्टाचे निर्देश, अनेक चर्चांनंतर आम्ही अयोध्येत सुन्नी वक्फ बोर्डाला 5 एकर जमीन मंजूर केली आहे, असं मोदी म्हणाले.

उत्तर प्रदेश सरकारला सुन्नी वक्फ बोर्डाला 5 एकर जमीन देण्यासाठी तातडीने पावलं उचलत आहे. सर्वधर्माचे लोक एक आहेत. कुटुंबातील सदस्य सुखी-समृद्ध व्हावेत, देशाचा विकास व्हावा, यासाठी सबका साथ सबका विकास, या ध्येयाने वाटचाल सुरु आहे. अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी सर्वांनी एकमत द्यावं, असं आवाहन मोदींनी केलं.

आमच्या सरकारने निर्णय घेतला आहे की अधिकृत जमीन जी जवळपास 67.03 एकर आहे आणि बाहेर अंगण हे राम जन्मभूमी तीर्थक्षेत्रात रुपांतरीत करण्यात येईल. राम जन्मभूमी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर, भारतातील जनतेने जो समजूतदारपणा दाखवला, त्याबद्दल मी भारताच्या 130 कोटी जनतेला सलाम करतो, असं मोदी म्हणाले.

अमित शाहांकडून घोषणा

दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांनी श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये  15 ट्रस्टी असतील, यामध्ये एक ट्रस्टी हा अनुसूचित जातीतील असेल, असं जाहीर केलं. सामाजिक सौहार्द मजबूत करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल पंतप्रधान  नरेंद्र मोदींचं आभार, असं ट्विट अमित शाहांनी केलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI