AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मला जेलमध्ये टाकण्यासाठी जाळं टाकण्यात आलं’, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मोठं विधान

केंद्रीय तपास यंत्रणांकडून देशभरात विविध पक्षाच्या नेत्यांवर कारवाई केली जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मोठं विधान समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका कार्यक्रमात मोठं विधान केलं आहे.

'मला जेलमध्ये टाकण्यासाठी जाळं टाकण्यात आलं', पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मोठं विधान
| Updated on: Mar 28, 2023 | 10:59 PM
Share

मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांकडून देशभरात विविध पक्षाच्या नेत्यांवर कारवाई केली जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचं मोठं विधान समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका कार्यक्रमात मोठं विधान केलं आहे. मला जेलमध्ये टाकण्यासाठी जाळं टाकलं होतं, असं मोठं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नरेंद्र मोदी हे भारताचे गेल्या नऊ वर्षांपासून पंतप्रधान पदावर कार्यरत आहेत. त्याआधी त्यांनी तब्बल 15 वर्षे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सांभाळली आहेत. असं असताना त्यांना अटक करण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक दावा पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.

“मला जेलमध्ये टाकण्यासाठी जाळं टाकलं होतं. पण विरोधक यशस्वी होऊ शकले नाहीत”, असं मोठं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरंतर नाव न घेता काँग्रेसवर याबाबतची टीका केली आहे. तसेच काँग्रेस सत्तेत असताना काही लोक बँकेला लुटून पळाले, असंदेखील मोदी म्हणाले आहेत.

नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

“भ्रष्टाचाराने आपल्या देशाचं खूप नुकसान केलं आहे. भ्रष्टाचाराने देशाला खूप सतावलं आहे. देशाची जनता पाहत आहे की, आधीच्या सरकारांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात कारवाईच्या नावाने फक्त खानापुरी केली. हे तर ते लोकं ज्यांनी मलाही जेलमध्ये टाकण्यासाठी काय-काय जाळं नाही टाकलं. पण ते त्यामध्ये पूर्णपणे अयशस्वी ठरले”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी जनतेला आवाहन करताना परदेशात गेलेला काळा पैसा भारतात आणण्याचं वचन दिलं होतं. त्यानंतर नरेंद्र मोदी निवडून आले. भाजप सरकारने भ्रष्टाचार विरोधात कारवाई करत गेल्या नऊ वर्षात 1 लाख 10 हजार कोटींची संपत्ती जप्त केली आहे, अशी माहिती यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दिली.

याआधी देवेंद्र फडणवीस यांनीही असंच विधान केलेलं

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असंच काहीसं विधान केलं होतं. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना आपल्याल अटक करण्यासाठी जंग जंग पछाडण्यात आलं होतं, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. विशेष म्हणजे नुकतंच राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची फसवणूक करुन धमकी देण्याच्या प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणातही मोठे नेते आणि अधिकाऱ्यांची नावे समोर येणार असल्याचा दावा फडणवीसांनी केलाय.

निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.