PM Modi Varanasi Visit : पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेलं रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर नेमकं काय?

PM Narendra Modi Varanasi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा मतदारसंघ असलेल्या उत्तर प्रदेशातील वाराणसी (PM Modi Varanasi Visit) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मोदींनी काशी वाराणसीतील जनतेला तब्बल 1500 कोटींच्या विकासकामांची घोषणा केली.

PM Modi Varanasi Visit : पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेलं रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर नेमकं काय?
Rudraksh Convention Center varanasi

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा मतदारसंघ असलेल्या उत्तर प्रदेशातील वाराणसी (PM Modi Varanasi Visit) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मोदींनी काशी वाराणसीतील जनतेला तब्बल 1500 कोटींच्या विकासकामांची घोषणा केली. ज्यामध्ये बहुचर्चित रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरचाही (Rudraksh Convention Center) समावेश आहे. गेल्या सात वर्षातील मोदी 27 व्यांदा वाराणसी दौऱ्यावर आले आहेत. मोदींनी BHU अर्थात बनारस हिंदू विद्यापीठातील 100 बेडच्या चाईल्ड हेल्थ विंगचं उद्घाटन केलं.

पंतप्रधानांनी इथे डॉक्टरांशीही संवाद साधला. तसंच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेतला. त्याआधी त्यांनी एका सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं. काशी-वाराणसी भरभरुन देते. या शहरावर महादेवाचा आशिर्वाद आहे. काशीवासियांना विकासाची गंगा बहाल केली आहे, असं मोदी म्हणाले.


योगी आदित्यनाथ यांची कर्मठता आणि मेहनत यामुळे काशी आणि उत्तर प्रदेशचा विकास होत आहे. आज काशीमध्ये सर्व आजारांवर उपचार होत आहेत. यापूर्वी उपचारांसाठी दिल्ली किंवा मुंबईला जावं लागत होतं.

यावेळी पंतप्रधानांनी BHU ला 1500 कोटी रुपयांच्या विकासनिधीची घोषणा केली. आज त्यांच्या हस्ते जपानच्या सहयोगाने बनवण्यात आलेल्या रुद्राक्ष कन्वेंशन सेंटरचं (Rudraksh Convention Center) उद्घाटन होत आहे.

काय आहे रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर?

वाराणसीतील सिगरा इथं 186 कोटी रुपये खर्चून रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात आलं आहे. जपानच्या सहाय्याने याची रचना करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये इंडो-जपान कला आणि संस्कृतीची झलक पाहायला मिळते. काशी-क्योटो कार्यक्रमांतर्गत भारत आणि जपानच्या मैत्रीचा नमुना म्हणून रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरकडे पाहिलं जातं.

शिवलिंगाच्या आकृतीत हे रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर आहे. या सेंटरमध्ये स्टीलचे 108 रुद्राक्ष बसवण्यात आले आहेत. रुद्राक्षाची माळ 108 खड्यांची असते, त्यानुसार त्याची रचना करण्यात आली आहे.

रुद्राक्ष इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरचं डिझाईन जपानची कंपनी ओरिएंटल कन्स्लटंट ग्लोबलने बनवलं आहे. तर त्याची उभारणीही जपानच्याच फुजिता कॉरपोरेशनने केली आहे. इथे मोठे म्युझिक कॉन्सर्ट, कॉन्फरन्स, नाटक होऊ शकतात.

रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरची वैशिष्ट्ये

120 गाड्यांची भव्य पार्किंग सुविधा

हॉलमध्ये व्हिएतनामवरुन मागवलेल्या 1200 खुर्च्या

सेंटरमध्ये ग्रीन रुम

150 लोकांच्या क्षमतेचे दोन स्वतंत्र कान्फरन्स हॉल

110 किलोवॅट ऊर्जेसाठी स्वतंत्र सोलर प्लांट

भिंतींवर इटलीची वातानुकुलीत यंत्रणा

10 जुलै 2018 पासून बांधकाम

संबंधित बातम्या 

Cabinet Decision: सामान्य माणसाच्या हितासाठी सरकारचे मोठे निर्णय; कोणाला होणार फायदा आणि कसा ते जाणून घ्या

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI