AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोटाबंदी करून अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या मोदींनी देशाची माफी मागावी, नाना पटोलेंचा घणाघात

यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविचारीपणे निर्णय घेऊन हुकूमशहाप्रमाणे देशावर नोटाबंदी लादली. त्या काळा दिवसाला आज 5 वर्ष झालीत. हा निर्णय घेताना नोटाबंदीमुळे काळा पैसा, भ्रष्टाचार, दहशतवाद, नक्षलवाद, बनावट चलनी नोटा संपतील अशा थापा मारून देशाची दिशाभूल केली होती.

नोटाबंदी करून अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या मोदींनी देशाची माफी मागावी, नाना पटोलेंचा घणाघात
NANA PATOLE
| Edited By: | Updated on: Nov 08, 2021 | 6:47 PM
Share

मुंबई : पाच वर्षांपूर्वी आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविचारीपणे घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेकडो लोकांचे प्राण गेले, लाखो उद्योगधंदे बंद झाले, कोट्यवधी लोक बेरोजगार झाले आणि देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटल्याप्रमाणे नोटाबंदी ही संघटीत लूट असून, यामुळे जीडीपीत मोठी घसरण होईल हे आता सिद्ध झालेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या ऐतिहासिक घोडचुकीसाठी देशाची माफी मागून प्रायश्चित्त करावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले.

त्या काळा दिवसाला आज 5 वर्ष झालीत

यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविचारीपणे निर्णय घेऊन हुकूमशहाप्रमाणे देशावर नोटाबंदी लादली. त्या काळा दिवसाला आज 5 वर्ष झालीत. हा निर्णय घेताना नोटाबंदीमुळे काळा पैसा, भ्रष्टाचार, दहशतवाद, नक्षलवाद, बनावट चलनी नोटा संपतील अशा थापा मारून देशाची दिशाभूल केली होती. प्रत्यक्षात नोटाबंदीमुळे उद्योग व्यवसाय छोटे व्यापारी आणि रोजगार संपले आणि देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचे आपण सर्व पाहात आहोत. नोटाबंदीमुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली. देशाचा जीडीपी नीचांकी पातळीवर पोहोचला. अनौपचारीक क्षेत्राची अवस्था बिकट झाली. महागाई प्रचंड प्रमाणात वाढली असून सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले.

सामान्य माणूस यातून सावरला नाही

नोटाबंदीमुळे देशातील जनतेला प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, 50 दिवसांत सारे काही आलबेल होईल. त्याला आता पाच वर्ष पूर्ण झालीत, पण देशाची अर्थव्यवस्था आणि सामान्य माणूस यातून सावरला नाही. नोटाबंदीचे जे उद्देश पंतप्रधानांनी सांगितले होते, त्यातला एकही सफल झाला नाही. उलट अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. त्यामुळेच भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आता याबद्दल चकार शब्द काढत नाहीत. देशात काहीही चांगले झाले तरी आपल्यामुळेच झाले असे सांगून प्रत्येक गोष्टींचे भांडवल करून श्रेय लाटणाऱ्या मोदींनी आपल्या घोडचुकीबद्दल देशाच्या जनतेची माफी मागावी, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

संबंधित बातम्या

किरीट सोमय्यांविरोधात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल : अतुल लोंढे

Palkhi Marg | तब्बल 11 हजार कोटींचा खर्च, पूर्ण रस्त्यावर पदपथ, पालखी मार्ग आहे तरी कसा, काय फायदे होणार ?

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.