AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कैसा हराया….?’, मुंब्र्यातील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख अडचणीत, पोलिसांचा मोठा निर्णय

मुब्रा येथील नगरसेविका सहर शेख या सध्या सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल झाल्या आहेत, त्यांचा विजय झाल्यानंतर त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचं नाव न घेता कैसा हराया? असं म्हणत त्यांना डिवचलं होतं. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

'कैसा हराया....?', मुंब्र्यातील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख अडचणीत, पोलिसांचा मोठा निर्णय
Sahar Sheikh
| Updated on: Jan 22, 2026 | 6:32 PM
Share

राज्यात महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पहायला मिळालं, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुकांनी आपल्या पक्षाकडून तिकीट मिळालं नाही म्हणून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. भाजपमध्ये सर्वात जास्त इनकमिंग या काळात दिसून आलं, दरम्यान भाजपसह जवळपास सर्व पक्षांनी आपल्या पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या अनेक इच्छुकांना ऐनवेळी तिकीट दिलं, त्यामुळे निष्ठावंतांची नाराजी देखील पहायला मिळाली. काही पक्षांना या काळात निष्ठावंतांच्या नाराजीचा देखील फटका बसला. मुंबईमध्ये एकीकडे भाजप शिवसेना शिंदे गट यांची युती महापालिका निवडणुकीच्या मैदानात होती, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची देखील युती पहायला मिळालं. दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे तीनही पक्ष एकत्र आल्यानं त्यांच्या पक्षातील अनेक इच्छुकांचा महापालिका निवडणुकीसाठी पत्ता कापला गेला होता.

यामध्येच एक नाव होतं ते म्हणजे सहर शेख यांचं सहर शेख यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिकीट मिळालं नाही, त्यानंतर त्यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला. मुब्रा हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला मानला जातो.  मात्र आव्हाड यांच्याच बालेकिल्ल्यात त्यांना जबरदस्त हादरला देण्याचं काम सहर शेख यांनी केलं. सहर शेख विजयी झाल्यानंतर कैसा हाराया..? असं म्हणत त्यांनी जितेंद्र आव्हाडांना डिवचलं होतं, त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.

दरम्यान त्यानंतर त्यांनी एक मोठं विधान केलं होतं. मुंब्र्याला हिरवं करायचं आहे,  अशा अशायाचं ते विधान होतं, आता त्यांच्या या वक्तव्यावरून त्या अडचणीत आल्या आहेत. पोलिसांनी सहर शेख आणि त्यांचे वडील युनिश शेख यांना नोटीस बजावली आहे.  ज्यामुळे समाजात असंतोष निर्माण होईल, असं भाषण करू नये, असं या नोटीसमध्ये पोलिसांनी म्हटलं आहे. तसेच सोशल मीडियावर बोलताना देखील या पद्धतीचे वक्तव्य टाळा असंही पोलिसांनी म्हटलं आहे.  भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 168 नुसार मुंब्रा पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.