LIVE दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

LIVE दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

[svt-event title=”विखे सेनेला मदत करणार?” date=”22/03/2019,6:23PM” class=”svt-cd-green” ] राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीत शिवसेनेला मदत करणार, शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांचा दावा, भेटीदरम्यान विखेंनी शब्द दिल्याचा लोखंडे यांचा दावा [/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीचे आणखी दोन उमेदवार” date=”22/03/2019,5:37PM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीचे दोन उमेदवार जाहीर, माढा लोकसभा मतदारसंघातून संजयमामा शिंदे , तर उस्मानाबादमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी [/svt-event]

[svt-event title=”संजय काकडे भाजपमध्येच – मुख्यमंत्री” date=”22/03/2019,2:01PM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे भाजपच्या व्यासपीठावर, संजय काकडे भाजपमध्येच, त्यांचा पुन्हा पक्षप्रवेश करण्याचा प्रश्न नाही: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस [/svt-event]

[svt-event title=”प्रवीण छेडा, भारती पवार भाजपमध्ये” date=”22/03/2019,1:58PM” class=”svt-cd-green” ] मुंबईतील काँग्रेस नगरसेवक प्रवीण छेडा यांची घरवापसी, भाजपमध्ये प्रवेश, तर नाशिकमधील राष्ट्रवादीच्या नेत्या भारती पवारही भाजपमध्ये दाखल [/svt-event]

[svt-event title=”भाजप खासदार नाराज” date=”22/03/2019,12:40PM” class=”svt-cd-green” ] नाशिक : भाजप खासदार हरिशचंद्र चव्हाण यांच्या घरी कार्यकर्त्यांची बैठक सुरु, राष्ट्रवादीच्या नेत्या भारती पवार यांच्या भाजप प्रवेशानंतर चव्हाण नाराज, चव्हाण बैठकीनंतर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष [/svt-event]

[svt-event title=”संजय शिंदेंचा आज राष्ट्रवादीत प्रवेश?” date=”22/03/2019,10:59AM” class=”svt-cd-green” ] पुणे : बारामतीत शरद पवारांच्या उपस्थितीत संजय शिंदे आज राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता, संजय शिंदे हे भाजप पुरस्कृत सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांचे संजय शिंदे हे बंधू, संजय शिंदे यांना माढ्यातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”अद्याप आघाडी झालेली नाही: राजू शेट्टी” date=”22/03/2019,10:14AM” class=”svt-cd-green” ] काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याशी आमची आघाडी झाली नाही, आम्हाला भाजप सरकारने फसवले आहे.काँग्रेस-राष्ट्रवादीने जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, शेतीमालाला दीडपट हमीभाव देणे, या प्रमुख मागण्या मान्य केल्या तर आम्ही आघाडीशी चर्चा करू नाहीतर आम्ही स्वबळावर लढू, राजकारण आमचा धंदा नाही, इथून पुढे शेतकऱ्यांसाठी लढू, भाजपाचे कमळ मुळापासून उपटून काढू : खासदार राजू शेट्टी [/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीकडून माढ्यात संजय शिंदे?” date=”22/03/2019,10:10AM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीकडून माढ्यात संजय शिंदे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता, राष्ट्रवादी आज उमेदवार जाहीर करण्याचे संकेत [/svt-event]

[svt-event title=”वर्ध्यातील उमेदवारांचे अर्ज” date=”22/03/2019,10:08AM” class=”svt-cd-green” ] भाजपा आणि काँग्रेस उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार, भाजपकडून रामदास तडस, तर काँग्रेसकडून चारुलता टोकस उमेदवारी अर्ज भरणार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार,भाजपा आमदारांसह शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार, काँग्रेसही आमदारांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार [/svt-event]

[svt-event title=”चंद्रपूरच्या जागेसाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच ” date=”22/03/2019″ class=”svt-cd-green” ] चंद्रपूर : भाजपचे खासदार रामदास तडस अध्यक्ष असलेल्या तैलीक महासभेचं राहुल गांधींना पत्र, चंद्रपूर लोकसभेत तेली समाजाला उमेदवारी देण्याची काँग्रेसकडे मागणी, विदर्भात तेली समाजाची 65 लाख मतदार, तरीही गेली 18 वर्ष काँग्रेसकडून तेली समाजाला उमेदवारी नाही, लोकसभेची जागा तेली समाजाला न दिल्यास काँग्रेसला फटका बसण्याचा महासंघांचा इशारा [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेसच्या नगरसेवकाचा आज भाजप प्रवेश” date=”22/03/2019″ class=”svt-cd-green” ] मुंबई : काँग्रेस नगरसेवक प्रवीण छेडा आज भाजपमध्ये प्रवेश करणार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती छेडा यांचा पक्षप्रवेश होणार [/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीवर नाराज भारती पवार भाजपमध्ये जाणार ” date=”22/03/2019″ class=”svt-cd-green” ] नाशिक : राष्ट्रवादीच्या नेत्या भारती पवार आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दिंडोरीतून लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने भारती पवार नाराज आहेत. त्यामुळे त्या आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दुपारी साडे बारा वाजता भाजपात प्रवेश करणार आहेत. [/svt-event]