फडणवीसांनी बेस पक्का करावा, 'एक शरद बाकी गारद'वरुन संजय राऊतांचा हल्लाबोल

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या मुलाखतीवरुन केलेल्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. Sanjay Raut comment on Ek Sharad Baki Garad

फडणवीसांनी बेस पक्का करावा, 'एक शरद बाकी गारद'वरुन संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या मुलाखतीवरुन केलेल्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. “देवेंद्र फडणवीस हे राजकारणात नव्हते, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी शरद पवारांवर ‘एक शरद बाकी गारद’ अशा शीर्षकाचा अग्रलेख लिहिला होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यास करावा, बेस पक्का करावा, त्यानंतर बोलावं”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. (Politics over Sharad Pawar interview by Sanjay Raut Ek Sharad Baki Garad)

संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस राजकारणात नव्हते, त्याआधी शरद पवार यांच्या राजकीय झंझावातावर बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिकमध्ये अग्रलेख लिहिला होता, त्याचं हे टायटल आहे. एक शरद बाकी गारद, हे बाळासाहेबांनी म्हटलं होतं त्या काळात. खरंतर बाळासाहेबांनी त्यावेळी दोन शरदांविषयी लिहिलं होतं, दुसरे शरद म्हणजे शरद जोशी. त्यामुळे त्यांनी ‘दोन शरद सगळे गारद’ असं म्हटलं होतं. आता एक शरद नाहीत, त्यामुळे राहिले एकच शरद. त्यामुळे त्यांना अभ्यासात थोडा बेस पक्का करावा लागेल. हे बाळासाहेबांचं वाक्य आहे, पवारांविषयी म्हटलेलं. तेव्हा ते राजकारणात नव्हते. आम्ही बाळासाहेबांसोबत काम करत होतो.”

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीला शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘एक शरद बाकी गारद’ऐवजी, ‘एक नारद बाकी गारद’ असं टायटल द्यायला हवं होतं, असा टोला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. ‘बाकी सर्व गारद असतील, तर उद्धव ठाकरेही गारद आहेत का?’ असा बोचरा सवाल फडणवीसांनी विचारला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर! 

शरद पवारांच्या मुलाखतीवरुन सामना

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकात शनिवारपासून तीन दिवस प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीला संजय राऊत यांनी एक शरद बाकी सर्व गारद असं शीर्षक दिलं आहे.

VIDEO : 

(Politics over Sharad Pawar interview by Sanjay Raut Ek Sharad Baki Garad)

संबंधित बातम्या 

उद्धव ठाकरेही गारद का? एक शरद बाकी गारद नव्हे, तर एक नारद बाकी गारद : देवेंद्र फडणवीस

 ‘सामना’ची भूमिका रोज बदलते, कधी पवारांच्या बाजूने, कधी राज्यपालांच्या : देवेंद्र फडणवीस

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *