पूजा चव्हाण आत्महत्या | भाजपचा आक्रमक पावित्रा, राज्यभर चक्काजाम आंदोलनाचा इशारा 

| Updated on: Feb 26, 2021 | 5:56 PM

या पार्श्वभूमीवर उद्या भाजप महिला मोर्चाचे चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. (Pooja Chavan Suicide Case BJP Agitation against Sanjay Rathod)

पूजा चव्हाण आत्महत्या | भाजपचा आक्रमक पावित्रा, राज्यभर चक्काजाम आंदोलनाचा इशारा 
पूजा चव्हाण भाजप
Follow us on

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी भाजपने आक्रमक पावित्रा घेतला आहे. या प्रकरणी भाजपकडून राज्यभर आंदोलन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्या भाजप महिला मोर्चाचे चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. तर येत्या 1 मार्चला उग्र आंदोलनाचा इशारा भाजपतर्फे दिला आहे. तसेच भाजपा ओबीसी मोर्चा 3 मार्चला आसूड आंदोलन करणार आहे. वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा आणि कारवाईसाठी हे आंदोलन केले जाणार आहे. (Pooja Chavan Suicide Case BJP Agitation against Sanjay Rathod)

पूजा चव्हाण या तरुणीच्या संशयास्पद मृत्यूची राज्य सरकार चौकशी करणार आहे की नाही? असा सवाल भाजपा प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष उमा खापरे यांनी केला आहे. भाजपतर्फे शुक्रवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी पूजाच्या मृत्यूची चौकशीची घोषणा तातडीने केली नाही आणि संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर, महिला मोर्चातर्फे राज्यभर चक्काजाम आंदोलन केले जाईल. उद्या शनिवारी 27 फेब्रुवारीला हे आंदोलन केले जाणार आहे.

“पोलिसांवर सत्ताधाऱ्यांचा दबाव”

पूजा चव्हाणचा 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाच्या मृत्यूला 19 दिवस उलटून गेले तरी पोलिसांनी या घटनेबाबत प्राथमिक माहिती अहवालही दाखल केला नाही. पूजाच्या ऑडिओ क्लिपमधील संवादावरून संबंधित व्यक्तींची पोलिसांनी साधी चौकशीही केलेली नाही. पोलीस हाताची घडी, तोंडावर बोट ठेवून गप्प बसले आहेत. याचा अर्थ पोलिसांवर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे, असेही खापरे यांनी सांगितले.

महिलांच्या प्रतिष्ठेबाबत सातत्याने बोलणारे पुरोगामी नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारचा कारभार सुरु आहे. मात्र या काळात एका तरुणीच्या मृत्यूकडे इतक्या असंवेदनशील पद्धतीने पाहिले जात आहे, याची खंत वाटते. पूजा चव्हाणच्या मृत्यूबाबत जे जे पुरावे बाहेर आले आहेत, त्या सर्व पुराव्यांतून या प्रकरणाशी राठोड यांचा संबंध आहे, हेच दिसून येते. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून राठोड यांना अभय दिले जात असल्याचेही दिसून येते आहे.

…तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवू

मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा तातडीने राजीनामा घ्यावा. जर राठोड यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे. राठोड यांचा राजीनामा घेतला जात नाही. तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवू, असेही खापरे यांनी सांगितले.

केवळ सत्ताधारी पक्षाचा नेता आणि मंत्री असल्याने त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पूजाच्या संशयास्पद मृत्यूवेळी तिच्याबरोबर असलेले दोघे कुठे गेले याचा तपास करण्याची गरजही पोलिसांना वाटू नये, हे धक्कादायक आहे. पूजाच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी वानवडी पोलिसांकडून काढून घेऊन उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांकडून केली जावी, अशी महिला मोर्चाची मागणी आहे. (Pooja Chavan Suicide Case BJP Agitation against Sanjay Rathod)

संबंधित बातम्या : 

VIDEO : माझी बहीण वाघीण होती, ती आत्महत्या करुच शकत नाही, पूजाच्या बहिणीची पहिली प्रतिक्रिया

VIDEO| अरुण राठोडला आम्ही ओळखत नाही, पूजाच्या आईचा धक्कादायक खुलासा