शेवटी जे नको होतं तेच झालं, ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, मोठी अपडेट समोर!

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निडवणुकीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. असे असतानाच आता उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांनी मोठी चाल खेळली आहे.

शेवटी जे नको होतं तेच झालं, ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, मोठी अपडेट समोर!
uddhav thackeray and eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 29, 2025 | 7:05 PM

chhatrapati sambhaji nagar : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा रणधुमाळी रंगली आहे. आपल्या पक्षाची सरशी व्हावी म्हणून जमेल त्या मार्गाने प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील बडे नेते प्रचार करत आहेत. सत्तेत असणारी महायुती आम्ही एकत्र असून आमच्यात कोणतेही मदभेद नाहीत, असे वारंवार सांगत आहे. प्रत्यक्ष मात्र महायुतीतील अनेक स्थानिक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारली आहे. या पक्षबदलांमुळे महायुतीत बेबनावही पाहायला मिळाला. दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटकपक्षाच्या अनेक नेत्यांनी महायुतीतील पक्षांमध्ये प्रवेश केल्याचेही पाहायला मिळाले. असे असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमधून मोठी माहिती समोर येत आहे. येथे उद्धव ठाकरे यांना जबर धक्का बसला असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट सदस्या पूनम खरगे आणि ठाकरेंच्या युवासेनेचे शहरप्रमुख सागर खरगे या पती-पत्नीने आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा पार पडला. या वेळी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भूमरे, तसेच युवासेना मराठवाडा निरीक्षक ऋषिकेश जैस्वाल उपस्थित होते. या पक्षप्रवेशावेळी खरगे दाम्पत्याने शक्तीप्रदर्शन केले. तसेच आगामी काळात पक्ष वाढवण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार, अशी ग्वाही दिली. पूनम खरगे आणि सागर खरगे यांनी ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्याने आगामी महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंना फटका बसू शकतो, असे म्हटले जात आहे.

महापालिकेच्या निकालावर परिणाम पडणार म्हणून…

दरम्यान, छत्रपती संभाजनीगरमध्ये काही नगरपालिकांची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत आपलेच वर्चस्व कायम राहावे यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केले जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेत यश आले तर भविष्यात आमदारकी लढवतानाही ताकद दिसेल, हा उद्देश समोर ठेवून शिंदे यांचे आमदार या निवडणुकीत पूर्ण ताकद लावताना दिसत आहेत. पुढच्या काही दिवसांत महापालिकेची निवडणूक लागणार आहे. त्यामुळे सध्याच्या निवडणुकीचा परिणामही महापालिकेच्या निकालावर पडू शकतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्यांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळे भविष्यात नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.