शरद पवार-अमित शाह भेटले की नाही, खुद्द प्रफुल्ल पटेलांनी कोडं सोडवलं

शाह आणि पवारांच्या भेटीवेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते असं सांगितलं जात आहे. दरम्यान, या भेटीच्या चर्चेवर आता प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

शरद पवार-अमित शाह भेटले की नाही, खुद्द प्रफुल्ल पटेलांनी कोडं सोडवलं
शरद पवार आणि अमित शाह यांची भेट झाली नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांचं स्पष्टीकरण
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 6:51 PM

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची अहमदाबादेत भेट झाल्याचा दावा सध्या केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या भेटीबाबत स्पष्ट नकार देण्यात आलाय. तर स्वत: अमित शाह यांनी मात्र सर्व भेटी सार्वजनिक केल्या जात नाहीत असं सांगत याबाबतचं गूढ वाढवलं आहे. शाह आणि पवारांच्या भेटीवेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते असं सांगितलं जात आहे. दरम्यान, या भेटीच्या चर्चेवर आता प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.(Praful Patel clarification on Amit Shah and Sharad Pawar meet)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी एकत्र येणार या चर्चा चुकीच्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार स्थिर आणि सुरक्षित आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा पाया शरद पवार यांनीच रचला आहे. त्यामुळे अशा चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचं पटेल यांनी म्हटलंय.

अमित शाहांनी सस्पेन्स वाढवला!

प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण देण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत पवारांच्या भेटीबाबत एक वक्तव्य केलं होतं. सर्व भेटी सार्वजनिक केल्या जात नाहीत, असं शाह यांनी म्हटलं. शाहांच्या या वक्तव्यानंतर राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडून पवार आणि शाह यांची भेट झालीच नसल्याचं म्हटलंय.

राष्ट्रवादीकडून भेटीच्या वृत्ताचं खंडन

26 मार्चला अहमदाबादमधील एका फार्म हाऊसवर ही भेट झाल्याची माहिती एका गुजराती दैनिकाने दिली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून या वृत्ताचे खंडन करण्यात आले आहे. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अहमदाबादमधून थेट मुंबईला आले. ते कोणालाही भेटले नाहीत. मात्र, आता एका गुजराती दैनिकात त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी आली आहे. हे भाजपचे षडयंत्र आहे. शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी निव्वळ अफवा आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना स्पष्ट केलं आहे.

अमित शाहांची पवार-पटेलांशी गुप्त भेट?

शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती ‘दिव्य भास्कर’ या गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते. त्यानंतर शांतिग्राममधील गेस्टहाऊसला तिघांची भेट झाली, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर या भेटीचे परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या :

शरद पवार अहमदाबादमध्ये अमित शाहांना भेटले का, राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

शरद पवार-अमित शाहांची भेट; नव्या पिढीला हे राजकारण समजणार नाही: जितेंद्र आव्हाड

Praful Patel clarification on Amit Shah and Sharad Pawar meet

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.