AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीचे बंडखोर शरद पवार यांना भेटले, तासभर चर्चा; काय घडलं भेटीत?

अजित पवार गटाच्या 30 आमदारांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या आमदारांनी तासभर शरद पवार यांच्याशी चर्चा केली. सलग दुसऱ्या दिवशी अजितदादा गटाने शरद पवार यांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रवादीचे बंडखोर शरद पवार यांना भेटले, तासभर चर्चा; काय घडलं भेटीत?
| Updated on: Jul 17, 2023 | 3:51 PM
Share

मुंबई | 17 जुलै 2023 : अजित पवार गटाच्या 30 आमदारांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या आमदारांनी तासभर शरद पवार यांच्याशी चर्चा केली. सलग दुसऱ्या दिवशी अजितदादा गटाने शरद पवार यांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीनंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मीडियाशी संवाद साधला. काल काही आमदारांना शरद पवार यांचं दर्शन घेता आलं नाही. त्यामुळे आम्ही त्यांना आज घेऊन आलो, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी भेटीतील तपशील दिला. शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी, दर्शनासााठी आम्ही चव्हाण सेंटरला आलो होतो. काल रविवार असल्याने आमदार मतदारसंघात होते. त्यांना शरद पवार यांची भेट घेता आली नव्हती. आज विधीमंडळाचं अधिवेशन सुरू झाल्याने अनेक आमदार मुंबईत होते. केवळ मंत्रीच नव्हे तर इतरही आमदारांना शरद पवारांचे आशीर्वाद घ्यायचे होते, ती संधी आम्ही त्यांना मिळवून दिली आहे, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

त्यांच्या मनात काय हे मला कसं माहीत?

कालप्रमाणे आजची भेट पूर्वनियोजित नव्हती. शरद पवार चव्हाण सेंटरला येणार असल्याची माहिती काढली. त्यामुळे आम्ही इथे आलो. सर्वांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यांना कालच्या प्रमाणे विनंती केली. पक्ष एकसंघ राहावा अशी विनंती केली. पवारांनी आमचं कालप्रमाणेच म्हणणं ऐकून घेतलं. शांतपणे सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यांच्या मनात काय आहे हे मी आज कसं बोलू शकतो?, असा सवाल पटेल यांनी केला.

पवार आमचे नेते

दरम्यान, शरद पवार हे आमचे नेते होते. आहेत आणि राहतील, असं सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. त्यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला. तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनीही शरद पवार यांच्या भेटीबाबत प्रफुल्ल पटेलच अधिक माहिती देतील असं स्पष्ट केलं. दरम्यान, शरद पवार गटाकडून या भेटीबाबतची कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे या भेटीत आणखी काय घडलं याची माहिती समोर आलेली नाही.

मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर.
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक.
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.