AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांनी भीमा कोरेगावसंबंधी कागदपत्रं जाहीर करावी : प्रकाश आंबेडकर

“आमच्या बंदला 35 संघटनांनी पाठिंबा दिला होता. 100 संस्थाही सहभागी होत्या. आमचा बंद यशस्वी झाला, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला

शरद पवारांनी भीमा कोरेगावसंबंधी कागदपत्रं जाहीर करावी : प्रकाश आंबेडकर
| Updated on: Jan 24, 2020 | 4:18 PM
Share

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात पुकारलेला महाराष्ट्र बंद मागे घेतला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन बंद मागे घेण्याची घोषणा केली. यावेळी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे भीमा कोरेगाव प्रकरणी कागदपत्रं असतील तर त्यांनी ती जाहीर करावी, अशी विनंती प्रकाश आंबेडकरांनी केली. मात्र या प्रकरणी एसआयटी चौकशीची गरज वाटत नाही, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी (Prakash Ambedkar on Koregaon Bhima) व्यक्त केलं.

“आमच्या बंदला 35 संघटनांनी पाठिंबा दिला होता. 100 संस्थाही सहभागी होत्या. आमचा बंद यशस्वी झाला. आम्हाला सरकार आणि जनतेला या संदेश देण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला होता. केंद्र सरकारने आता जागं होऊन, एनआरसीबाबत आपलं पाऊल मागे घ्यावं”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

“आम्ही पक्षाच्या वतीने आणि इतर संघटना यांनी बंद पुकारण्याचं ठरवलं होतं. आम्हाला जनतेने साथ दिली. बंद यशस्वी झाला, जनतेचे आभार. कुठे गडबड झाली नाही. अमरावतीत लाठीचार्ज झाला, पण नंतर सोडून दिलं. घाटकोपरमध्ये बसवर दगड मारला. पण त्याने चेहरा झाकला होता, तो कार्यकर्ते आमचा नव्हता. आम्हाला जो संदेश द्यायचा होता, CAA आणि एनसीआर हा मुस्लिमांप्रमाणे हिंदूंच्याही विरोधात आहे. बंदमागचा आमचा हेतू साध्य झाला आहे.” असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.

कोरेगाव भीमा दंगल हे फडणवीस सरकारचं षडयंत्र, पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

यावर्षी तोट्याचं बजेट केंद्र सरकार सादर करण्याची शक्यता आहे. बँक घोटाळ्यामुळे देशाचं नाक कापलं जाणार आहे. हे आम्ही लोकांना सांगितलं.

आमच्या 3 हजार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. आम्ही पोलिसांशी बोलतोय. आम्ही कुठेही तोडफोड केली नाही. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना सोडण्यात यावं असं आम्ही त्यांना सांगतोय. आम्ही जबरदस्ती केली असती तर आम्ही टॅक्सी, बस, बंद पडल्या असत्या, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आरएसएसने असा प्रचार सुरू केला आहे की या कायद्याचा हिंदूंवर कोणताही परिणाम होणार नाही. पण आजच्या बंदच्या काळात आम्ही कायद्याबाबत सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यात आम्ही यशस्वी ठरलो, असा दावा आंबेडकरांनी केला. भारतात पाक, बांगला देशचे किती मुस्लिम आहेत? केंद्र सरकारने आधी जाहीर करावं. ते या मुद्यावर ढोल वाजवत आहेत. कोणतरी स्टेटमेंट देतं, त्याचा या समाजावर किती परिणाम होतो याचा कुणीच विचार करत नाही, असं आंबेडकर म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले होते?

कोरेगाव भीमा दंगलीमागे तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारचं षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी अशी मागणीही पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची गरज आहे. कारण देवेंद्र फडणवीस सरकारने सत्तेचा चुकीचा वापर केला. फडणवीस सरकारने माध्यमांनाही चुकीची माहिती दिली. तसेच पोलिसांच्या मदतीने हे घडविलेले षडयंत्र होते. मुख्य सूत्रधारांना पाठीशी घालून जनतेची दिशाभूल करण्याचा डाव होता, असा आरोप पवारांनी केला आहे.

Prakash Ambedkar on Koregaon Bhima

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.