AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे सरकार चोरांचे, खुन्यांचे, लगोलग बरखास्त करा, प्रकाश आंबेडकर घेणार राज्यपाल कोश्यारी यांची भेट

ठाकरे सरकार चोरांचे, खुन्यांचे असून ते बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर करणार आहेत. | Prakash Ambedkar Will Meet Governor Bhagat Singh Koshyari

ठाकरे सरकार चोरांचे, खुन्यांचे, लगोलग बरखास्त करा, प्रकाश आंबेडकर घेणार राज्यपाल कोश्यारी यांची भेट
प्रकाश आंबेडकर
| Updated on: Mar 22, 2021 | 7:06 AM
Share

मुंबई : ठाकरे सरकार चोरांचे, खुन्यांचे असून ते बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) करणार आहेत. आज दुपारी प्रकाश आंबेडकर यांच्या साथीने वंचितचे एक शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेऊन ही मागणी करणार आहे. (Prakash Ambedkar Will Meet Governor Bhagat Singh Koshyari Over parambir singh letter)

प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं काय?

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकारणातील क्रिमिनल एलिमेंट आणि प्रशासनामधील क्रिमिनल एलिमेंट एकत्र येऊन काय काय घडवून आणू शकतात याचे चित्र आपण पाहात आहोत. मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी शंभर कोटी रुपये कसे वसूल केले हे स्पष्ट करण्यात आले आहे. हा आकडा आमच्या दृष्टीने कमी असला तरी त्यामध्ये नेक्सेस उभे राहिल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. सोलापूरच्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर प्रहाल केले.

आज दुपारी आंबेडकर राज्यपालांच्या भेटीला जाणार

आज (सोमवार) दुपारी  12 वाजण्याच्या सुमारास प्रकाश आंबेडकर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. तसंच वंचित आघाडीकडून त्यांना निवेदन देणार आहोत. हे सरकार बरखास्त करावे मात्र सरकार बरखास्त करीत असताना सभागृह बरखास्त करू नये असेही राज्यपालांना सांगणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

बहुमतावर कुरघोडी कराल तर आग लागेल… सेनेचा इशारा

परमबीर हे विरोधकांची ‘डार्लिंग’ झाले आहेत व परमबीर सिंग (parambir Singh) यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारवर निशाणा साधीत आहेत. महाविकास आघाडी सरकारजवळ आजही चांगले बहुमत आहे. बहुमतावर कुरघोडी कराल तर आग लागेल. हा इशारा नसून वस्तुस्थिती आहे, अशी आक्रमक भूमिका आजच्या सामना अग्रलेखातून मांडण्यात आली आहे.

एखाद्या अधिकाऱ्यामुळे सरकारे येत नाहीत व कोसळत नाहीत

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी जो आरोपांचा धुरळा उडवला आहे, त्यामुळे गृहखात्याची प्रतिमा नक्कीच मलिन झाली आहे. हा सरकारच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे व विरोधी पक्षाच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे. परमबीर सिंग यांच्या निलंबनाची मागणी कालपर्यंत महाराष्ट्रातील विरोधी पक्ष करीत होता. परंतु एखाद्या अधिकाऱ्यामुळे सरकारे येत नाहीत व कोसळत नाहीत, हे विरोधकांनी विसरू नये!

(Prakash Ambedkar Will Meet Governor Bhagat Singh Koshyari Over parambir singh letter)

हे ही वाचा :

परमबीर हे विरोधकांची ‘डार्लिंग’, बहुमतावर कुरघोडी कराल तर आग लागेल, हा इशारा नसून वस्तुस्थिती : शिवसेना

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.