AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाचा प्रकोप, कित्येक जणांचं संपूर्ण कुटुंबच कोरोनाबाधित, देवेंद्रजी, आता आपणच शासनाला मार्गदर्शन करा : प्रकाश मेहता

माजी मंत्री प्रकाश मेहता यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाच्या काळात देवेंद्रजी आपणच शासनाला मार्गदर्शन करा, अशी विनंती केली आहे. | Prakash Mehta Facebook Post

कोरोनाचा प्रकोप, कित्येक जणांचं संपूर्ण कुटुंबच कोरोनाबाधित, देवेंद्रजी, आता आपणच शासनाला मार्गदर्शन करा : प्रकाश मेहता
Prakash mehta And Devendra fadanvis
| Updated on: Mar 26, 2021 | 7:10 AM
Share

मुंबई :  महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप सुरु आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून कोरोनाचे रुग्ण प्रचंड वाढतायत. अशा वेळी राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. अशा परिस्थितीत माजी मंत्री प्रकाश मेहता यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून देवेंद्रजी आपणच शासनाला मार्गदर्शन करा, अशी विनंती केली आहे. (Prakash Mehta request to Devendra Fadnavis through Facebook post over increasing Corona Cases)

कोरोनाची भीषण परिस्थिती सुरु आहे. कित्येक जणांचं संपूर्ण कुटुंबच कोरोनाबाधित आहे. कित्येकांची कुटुंबची कुटुंब रुग्णालयात आहेत. हे सगळं वेळीच थांबवण्यासाठी तुम्ही कृपया सकारात्मक मार्ग निघेल यासाठी शासनाला योग्य ते मार्गदर्शन करावे, अशी विनंती फेसबुक पोस्ट लिहून प्रकाश मेहता यांनी देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

प्रकाश मेहता यांंनी फेसबुक पोस्टमधून काय म्हटलंय…?

“देवेंद्रजी सप्रेम नमस्कार… कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात वाढला आहे. घाटकोपर मध्ये आज सर्वाधिक ३२७ रूग्ण पॉजिटिव निघाले आहेत. स्थानिक रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी जागा रिकाम्या नाहीत. परत पूर्ण लॉकडाऊन करायची वेळ येणार आहे की काय असे वाटू लागले आहे. आता तर कित्येकांचे संपूर्ण कुटुंबच कोरोनाबाधित असून एकाच रुग्णालयात उपचार घेताना आधळून येत आहेत”.

“पती, पत्नी, मुलगा, सूनबाई एकाच रुग्णालयात पण वेगवेगळ्या वॉर्ड मध्ये दाखल होताना दिसत आहेत. त्यामुळे हे सगळे वेळीच थांबवण्यासाठी तुम्ही कृपया सकारात्मक मार्ग निघेल यासाठी शासनाला योग्य ते मार्गदर्शन करावे ही विनंती करतो”.

महाराष्ट्रात सध्या कोरोनाची परिस्थिती काय?

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह अनेक मोठ्या शहरात कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढतोय. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारकडून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो. तसे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

राज्यात गुरुवारी 35 हजार 952 नवे कोरोना रुग्ण

राज्यात गुरुवारी दिवसभरात 35 हजार 952 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. गुरुवारी दिवसभरात 20 हजार 444 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर दिवसभरात 111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण 2 लाख 62 हजार 685 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 87.78% झाले आहे. आतापर्यंत एकूण 22 लाख 83 हजार 037 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या 13 लाख 62 हजार 899 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 13 हजार 770 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

(Prakash Mehta request to Devendra Fadnavis through Facebook post over increasing Corona Cases)

हे ही वाचा :

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा कहर, दिवसभरात तब्बल 35 हजार 952 नवे रुग्ण, 111 रुग्णांचा मृत्यू

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.