अमित शाहांच्या उपस्थितीत 19 सप्टेंबरला शिवसेना-भाजप युतीची घोषणा?

| Updated on: Sep 15, 2019 | 12:29 PM

नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेच्या समारोपावेळा भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत शिवसेना-भाजप युतीची घोषणा होण्याची शक्यता भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी वर्तवली

अमित शाहांच्या उपस्थितीत 19 सप्टेंबरला शिवसेना-भाजप युतीची घोषणा?
Follow us on

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीची घोषणा (Prasad Lad Shivsena BJP Alliance) 19 सप्टेंबरला होणार असल्याचे संकेत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी दिले आहेत. नाशिकमध्ये अमित शाहांच्या उपस्थितीत सेना-भाजप एकत्र निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब (Prasad Lad Shivsena BJP Alliance) होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होणार की नाही, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी युतीची घोषणा येत्या गुरुवारी, म्हणजेच 19 सप्टेंबरला होणार असल्याचे संकेत प्रसाद लाड यांनी रत्नागिरीत ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना दिले. युतीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चर्चेनंतर होणार असल्याचंही लाड म्हणाले.

नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेच्या समारोपात युतीची घोषणा (Prasad Lad Shivsena BJP Alliance) होण्याची शक्यता आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत युती संदर्भातील घोषणा होण्याची अपेक्षा लाड यांनी व्यक्त केली. येत्या दोन दिवसात विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची चिन्हं आहेत.

परंपरागत भाजपकडे असलेल्या रत्नागिरीतील पाचपैकी दोन जागा भाजपला मिळाव्यात, अशी अपेक्षा प्रसाद लाड यांनी व्यक्त केली. रत्नागिरी, राजापूर, चिपळूण आणि गुहागर या चारपैकी दोन जागा भाजपला मिळाव्यात, या मागणीवर भाजप ठाम असल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलं.

मेगाभरतीचं दुसरं पर्व लवकरच, विरोधी पक्षातील निम्मे आमदार भाजपच्या संपर्कात, प्रसाद लाड यांचा दावा

गुहागरमधून कमी मतांच्या फरकाने पराभूत झालेले तीन वेळ आमदार विनय नातू यांना उमेदवारी देण्याचा मानस प्रसाद लाड यांनी व्यक्त केला. कणकवली विधानसभेची जागा भाजपच्या चिन्हांवर लढवली जाईल, असा विश्वास लाड यांनी व्यक्त केला.

रत्नागिरीतून शिवसेनेचे उदय सामंत आमदार आहेत, तर राष्ट्रवादीतून शिवसेनेत घरवापसी करणारे भास्कर जाधव गुहागरमधील विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे दोन्ही जागांवर शिवसेना दावा सांगण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन जागांसह इतर जागांवरुन युतीत धुसफूस होणार, की शांतपणे अदलाबदली होणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

ठाणे ते सिंधुदुर्ग पट्ट्यातील दोन-तीन आमदार भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत, असं प्रसाद लाड काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.

महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री कोकणात येत आहेत. त्यावेळी सिंधुदुर्गात नारायण राणे यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन होणार का? या प्रश्नावर, हा निर्णय राणेंचा असल्याचं सांगत प्रसाद लाड यांनी बगल दिली.

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती प्रसाद लाड यांनी दिली.

संबंधित बातम्या :

भाजप-शिवसेनेत फॉर्म्युला ठरताना 22 ते 25 जागांची अदलाबदल : सूत्र