Prashant Kishor on Congress: प्रशांत किशोर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश नाहीच, सुरजेवाला यांच्या ट्विटमुळे सस्पेन्स संपला

Prashant Kishor on Congress: या समितीत प्रियंका गांधी, केसी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, पी. चिदंबरम, अंबिका सोनी, जयराम रमेश आणि मुकुल वासनिक आहेत.

Prashant Kishor on Congress: प्रशांत किशोर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश नाहीच, सुरजेवाला यांच्या ट्विटमुळे सस्पेन्स संपला
प्रशांत किशोर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश नाहीच, सुरजेवाला यांच्या ट्विटमुळे सस्पेन्स संपला
Image Credit source: tv9 marathi
भीमराव गवळी

|

Apr 26, 2022 | 4:35 PM

नवी दिल्ली: प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर  (Prashant Kishor) यांनी दोन आठवड्यापूर्वी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. काँग्रेस नेत्यांच्या या बैठकीत त्यांनी काँग्रेसला 2024मध्ये सत्तेत येण्यासाठी काय करावे लागेल याचा सल्ला दिला. तसेच काँग्रेसला पुनरुज्जीवीत करण्यासाठीचा रोड मॅप तयार करण्याची जबाबदारीही प्रशांत किशोर यांनी घेतली. त्यानंतर काही काँग्रेस नेत्यांनी प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं आवतनही दिलं. त्यामुळे प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये येण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांना प्रशांत किशोर यांनीच पूर्णविराम दिला आहे. मी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला (Randeep surjewala) यांनी ट्विट करून हे स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये जाण्याचा सस्पेन्स संपला आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी निर्णय घेण्याचा अधिकार असलेल्या अॅक्शन ग्रुप 2024ची स्थापना केली आहे. प्रशांत किशोर यांना आम्ही जबाबदारी देऊन या ग्रुपमध्ये सामिल होण्याचं निमंत्रण दिलं होतं. पण त्यांनी नकार दिला. त्यांनी पक्षाला दिलेल्या सल्ल्याचं आम्ही स्वागत करतो, असं ट्विट सुरजेवाला यांनी केला आहे. यावरून प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये सामील होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

प्रशांत किशोर काय म्हणाले

प्रशांत किशोर यांनीही ट्विट करून काँग्रेसमध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मी काँग्रेसमध्ये सामिल होणार नाही. काँग्रेसच्या निवडणुकीची जबाबदारी सांभाळणाऱ्या समूहात सामिल होण्याची ऑफर मी नाकारली आहे. काँग्रेसमध्ये मोठे बदल घडवण्यासाठी आणि काँग्रेसच्या संरचनात्मक समस्या दूर करण्यासाठी माझ्या पेक्षा अधिक सक्षम नेतृत्व आणि सामूहिक इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. हे माझं विनम्र मत आहे, असं प्रशांत किशोर यांनी म्हटलंय.

समितीचा अहवाल सोनिया गांधींकडे

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रशांत किशोर यांच्या सल्लयावर अहवाल देण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीत प्रियंका गांधी, केसी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, पी. चिदंबरम, अंबिका सोनी, जयराम रमेश आणि मुकुल वासनिक आहेत. या समितीने प्रशांत किशोर यांच्या सूचनांवर एक अहवाल तयार करून आपलं मत मांडलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत किशोर यांचे सर्वाधिक सल्ले व्यवहारिक आणि उपयोगी होते. हा अहवाल सोनिया गांधींकडे आला असून त्यावर निर्णय होणार आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें