भारताचं इकॉनॉमिक मॉडेल म्हणजे ‘जॉबलेस ग्रोथ’, प्रवीण तोगडिया यांचा तुफान हल्ला

देशाची आर्थिक परिस्थिती, ढासळलेली अर्थव्यवस्था आणि झपाट्याने होत चाललेलं खाजगीकरण या मुद्द्यांवरुन मोदींचे एकेकाळचे जीवलग मित्र प्रवीण तोगडिया यांनी मोदींवर जोरदार टीका केली.

भारताचं इकॉनॉमिक मॉडेल म्हणजे 'जॉबलेस ग्रोथ', प्रवीण तोगडिया यांचा तुफान हल्ला
नरेंद्र मोदी, पंतप्रधान

वर्धा : देशाची आर्थिक परिस्थिती, ढासळलेली अर्थव्यवस्था आणि झपाट्याने होत चाललेलं खाजगीकरण या मुद्द्यांवरुन पंतप्रधान मोदींचे (PM Narendra Modi) एकेकाळचे जीवलग मित्र प्रवीण तोगडिया (Pravin Togdiya) यांनी मोदींवर जोरदार टीका केली. मोदी सरकारचं आर्थिक धोरण जॉबलेस असल्याची टिप्पणी करत मोदींजींची आर्थिक धोरणं काही कामाची नसल्याची टीका त्यांनी केली.

वर्ध्यात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीनं कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आलं. यावेळी कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत तोगडिया बोलत होते. यावेळी तोगडिया यांनी नरेंद्र मोदी भेटत नसल्याची खंत व्यक्त करताना आर्थिक मॉडेलवर टीका केली.

झपाट्याने होत चाललेलं खाजगीकरण माझ्या समजण्यापलीकडचं

खाजगीकरणावरुन तोगडिया यांनी नरेंद्र मोदींना चांगलेच चिमटे काढले. देशात झपाट्याने होत चाललेलं खाजगीकरण माझ्या समजण्यापलीकडचं असल्याचं सांगत नरेंद्र भाई मेरे अच्छे दोस्त थे, पर अभी बिगड गये, असं तोगडिया म्हणाले.

संस्थाचं खाजगीकरण म्हणजे देशाच्या जनतेला लुटणं

भारताचा किंवा जगातला कोणताही व्यापारी फायद्यासाठी काम करतो यात दुमत नाही. पण हा नफा कोणाकडून कमावतो हा प्रश्न आहे. जेवढ्या सरकारी संस्था या खासगीकरणात जाणार तेवढे पाच टक्के जास्त पैसे जनतेला चुकवावे लागणार आहेत. रोड, रेल्वेस्टेशन, स्टेडियम हे खाजगी लोकांना देणं हे माझ्या समजण्यापलीकडे आहे. या संस्था खासगी संस्थांना देणे म्हणजे देशाच्या जनतेला लुटणे असंच आहे, असं ते म्हणाले.

भारताचं इकॉनॉमिकल मॉडेल बदलावे लागेल

युरोपात सरकारी मालमत्तेचं खाजगीकरण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र तेथील परिस्थिती बिकट झाली आणि सरकारला सबसिडी दयावी लागली. भारताचं इकॉनॉमिकल मॉडेल बदलावे लागेल.. एक टक्का जीडीपी वाढल्यास एक कोटी रोजगार वाढला पाहिजे मात्र भारतात तसं होत नाही याला जॉबलेस ग्रोथ म्हणतात. जीडीपी वाढल्यास सरकारच उत्पन्न वाढतं, सध्या भारताचा इकॉनॉमिकेल मॉडेल हा जॉबलेस ग्रोथचा आहे, यात सरकारला कर मिळेल मात्र तुम्हाला रोजगार मिळणार नाही, असंही तोगडिया म्हणालेत.

माझ्यासोबत बसले तर त्यांना समजावून सांगा

नरेंद्र मोदी माझे मोठे भाऊ आहेत. आमचे संबंध काही देखाव्याचे नाहीत. नरेंद्र मोदी आता सोबत बसत नाही. माझ्यासोबत बसले तर त्यांना काही गोष्टी समजावून सांगू, असा चिमटाही तोगडिया यांनी काढला.

तोडगिया-मोदी नातं कसं?

नरेंद्र मोदी हे माझे मोठे भाऊ आहे. माझ्या गावातून भाजी येत होती आणि ती माझ्या घरी येऊन नरेंद्र मोदी खात होते. आमचे संबंध काही देखाव्याचे नाहीय. पण त्यांचं वागणं बदललंय असं सांगत दोस्त दोस्त ना रहा, अशा प्रकारची सध्या अवस्था झाल्याचं त्यांनी आपल्या भाषणातून सांगितलं.

त्यांना राममंदिरच्या सुरुवातीला बाबरी मस्जिदीसाठी लढणारा अन्सारी प्रिय झाला. ज्याने राम मंदिरसाठी जीवन भर लढा दिला, तो प्रवीण तोगडिया प्रिय झाला नाही. मेरे नरेंद्र भाई को बाबूओ ने बिगाड दिया, नरेंद्र भाई बहोत अच्छे है, असं तोडगिया म्हणाले.

(Pravin Togdiya criticized Pm Narendra Modi over privatisation An Indian Economy)

हे ही वाचा :

मानवतेचा खून करण्याची शिकवण कुठलाच धर्म देत नाही, काबूलच्या रक्तपातावर राऊतांचा ‘विचारी’ अग्रलेख

सुक्ष्म आणि लहान, आता ते काय निधी देणार आहेत?, अजित पवारांचा राणेंना खोचक टोला

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI