फटाक्यांची आतिशबाजी अन् भला मोठा हार; पुण्यात अजित पवार यांचं जंगी स्वागत, राष्ट्रवादीचा ‘तो’ तटस्थ आमदार अजितदादासोबत

Ajit Pawar on Pune Daura : अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. उद्घाटनं, बैठका, सत्कार आजचा कार्यक्रम कसा असेल? पुणे जिल्हास्तरीय गणेशोत्सव नियोजन आढावा बैठकही आज पार पडेल. वाचा सविस्तर...

फटाक्यांची आतिशबाजी अन् भला मोठा हार; पुण्यात अजित पवार यांचं जंगी स्वागत, राष्ट्रवादीचा 'तो' तटस्थ आमदार अजितदादासोबत
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 10:13 AM

पुणे | 28 ऑगस्ट 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात ठिकठिकाणी त्यांचं जंगी स्वागत केलं जात आहे. हडपसरमध्ये फटाक्यांची आतिशबाजी करत आणि जेसीबीच्या सहाय्याने मोठा हार घालत अजित पवार यांचं स्वागत केलं गेलं. आज दिवसभर अजित पवार पुण्यात असणार आहेत. विविध कार्यक्रमांचं पुण्यात आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमांना अजित पवार हजेरी लावणार आहेत. भव्य ध्वजाचं लोकापर्ण आज पार पडलं आहे. गणेशोत्सव नियोजन आढावा बैठक आज पुण्यात पार पडते आहे. या बैठकीलाही अजित पवार उपस्थित असतील. तसंच आज संध्याकाळी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमालाही अजित पवारांची उपस्थिती असेल.

अजित पवारांच्या हस्ते 106 फुटी ध्वजाचा लोकापर्ण सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे हे अजित पवार यांच्यासोबत होते. मात्र चेतन तुपे यांची भूमिका अद्याप तटस्थ आहे. ते नेमके कुणासोबत आहेत, हे चेतन तुपे यांनी स्पष्ट केलेलं नाही, मात्र अजित पवारांच्या स्वागताला त्यांनी हजेरी लावली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

पुण्यात आज पार पडणार जिल्हास्तरीय गणेशोत्सव नियोजन आढावा बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. गणेशोत्सवा संदर्भात ही महत्त्वाची बैठक होतेय. पुणे शहर ,पिंपरी चिंचवड शहर, आणि पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. अजित पवार आणि चंद्रकांत पाटील एकत्रित बैठक घेत घेणार आहेत. यात पुण्यातील गणेशोत्सवाचा आढावा घेतला जाणार आहे.

या बैठकीला पुणे शहराचे पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल देखील उपस्थित राहणार आहेत. त्यासोबतच शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहतील. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात आज पार गणेशोत्सवा संदर्भातली महत्त्वाची बैठक होणार आहे.

पुण्यात आज शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी या ठिकाणी आज संध्याकाळी 5 वाजता सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील, चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, खेळाडू पुरस्कार, एकलव्य खेळाडू पुरस्कार (दिव्यांग खेळाडू), साहसी क्रीडा पुरस्कार आणि जिजामाता पुरस्कार शासनाने जाहीर केले आहेत. त्यांचं आज वितरण होणार आहे.

Non Stop LIVE Update
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.