AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यनगरी मोदीमय… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा कसा असेल? जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम…

PM Narendra Modi Pune Visit : दगडूशेठ गणपतीचं दर्शन, टिळक पुरस्काराने सन्मान अन् मेट्रोचं उद्घाटन; पाहा कसा असेल नरेंद्र मोदी यांचा संपूर्ण दौरा...

पुण्यनगरी मोदीमय... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा कसा असेल? जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम...
PM Narendra Modi
| Updated on: Aug 01, 2023 | 11:07 AM
Share

पुणे | 01 ऑगस्ट 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुण्यात दाखल झाले आहेत. लोकमान्य टिळक यांची आज 103 वी जयंती आहे. त्यानिमित्त लोकमान्य टिळक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी पुण्यात आले आहेत. मोदी यांचा आजचा दौरा कसा असणार आहे? त्यांचा आजचा दिनक्रम आणि कार्यक्रम कसा असणार आहे? यावर एक नजर टाकूयात….

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नुकतंच पुण्यातील लोहगाव विमानतळावर आगमन झालं आहे. तिथून हेलिकॉप्टरने शिवाजीनगरमधील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर दाखल होतील.

पंतप्रधानांच्या स्वागतासाछी कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर तयार करण्यात आलेल्या हेलिपॅड परिसरात राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत.

गणरायाच्या दर्शनाने दौऱ्याची सुरूवात

दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या दौऱ्याला सुरुवात होईल. 10.50 वाजता पंतप्रधान दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेणार आहेत. तसंच त्यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात येणार आहे. साडे अकरा वाजेपर्यंत पंतप्रधान दगडूशेठ मंदिरात असतील

पुरस्काराने सन्मान

पुण्यातील स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. त्यासाठी 11. 40 मिनिटांनी पंतप्रधान एसपी कॉलेजमध्ये दाखल होतील. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही तिथे उपस्थित असणार आहेत. 11. 45 ते 12. 30 या वेळेत पंतप्रधान स.प. महाविद्यालयात असतील.

12. 45 1. 45 यावेळेत पंतप्रधान पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील.

1. 45 2. 15 पंतप्रधान परतीच्या प्रवासाला निघतील

2. 25 वाजता ते शिवाजीनगरच्या अॅग्रीकल्चर कॉलेजमध्ये तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवर पोहोचतील.

2. 30 वाजता ते लोहगाव विमानतळाकडे रवाना होतील.

2. 50 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी लोहगाव विमानतळावर दाखल होतील.

2.55 पंतप्रधान मोदी दिल्लीच्या दिशेने रवाना होतील.

पुण्यनगरी मोदीमय…

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत असल्याने पुणे शहरात ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. ‘नमो स्वागतम्’ अशा आशयाचे बॅनर पुण्यात लावण्यात आले आहेत. ठिकठिकाणी भाजपचे झेंडेही पाहायला मिळत आहेत.

पुणेकरांमध्ये उत्सुकता

पंतप्रधान पुण्यात येणार असल्याने पुणेकरांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. स.प महाविद्यालयाच्या परिसरात पुणेकरांनी गर्दी केली आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.