AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाणीच नाही, मग मत का देऊ? पुणेकरांच्या प्रश्नाने बापटांच्या तोंडचं पाणी पळालं!

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. उमेदवारांच्या प्रचाराला सुद्धा वेग आला आहे. उमेदवार हे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. एकीकडे आपल्यालाच मतदान करा असा, आग्रह करणाऱ्या उमेदवारांना आता नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. पुण्यात भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना याचा चांगलाच अनुभ आला. गेली पाच वर्षे पुण्याचे […]

पाणीच नाही, मग मत का देऊ? पुणेकरांच्या प्रश्नाने बापटांच्या तोंडचं पाणी पळालं!
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM
Share

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. उमेदवारांच्या प्रचाराला सुद्धा वेग आला आहे. उमेदवार हे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. एकीकडे आपल्यालाच मतदान करा असा, आग्रह करणाऱ्या उमेदवारांना आता नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. पुण्यात भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना याचा चांगलाच अनुभ आला.

गेली पाच वर्षे पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहणारे पुणे लोकसभेचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना पुणेकरांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शुक्रवारी सायंकाळी गिरीश बापट हे पुण्यातल्या कॅम्प परिसरात प्रचार करत असताना तेथील नागरिकांनी बापट यांना पाणी प्रश्नावरून चांगलंच घेरलं.

आम्ही पाण्यासाठी गेले कित्येक दिवस झगडतो आहोत, मात्र आमच्या परिसरात पाणीच मिळत नाही आता आम्ही मतदान का करावे, असा प्रश्न उपस्थित करत या परिसरामध्ये बापट पाणी पुरवू शकले नाहीत असा आरोप नागरिकांनी केला. तसेच, आता आम्हाला तर पाणीच मिळत नसेल तर आम्ही मतदान का करावे असा थेट प्रश्नच नागरिकांनी बापटांना तोंडावर विचारला.

यावेळी गिरीश बापट यांची चांगलीच भांबेरी उडाली. नागरिकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे गिरीश बापट गोंधळून गेले. नागरिकांना नक्की काय उत्तर द्यावे असा प्रश्न त्यांना पडला आणि त्यांनी थातूरमातूर उत्तर देत नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिक प्रचंड वैतागले होते. त्यामुळे गिरीश बापट यांना मदत मागत असतानाच नागरिकांच्या या रोषाला सामोरे जावे लागल्याने भाजपच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

पाहा व्हिडीओ :

पुण्यात 23 एप्रिलला मतदान

पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून पालकमंत्री गिरीश बापट, तर काँग्रेसकडून मोहन जोशी रिंगणात आहेत. येत्या 23 एप्रिल रोजी पुण्यात मतदान होणार आहे.

Follow Us
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना.
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती.
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या....
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.