अवघ्या पाच फुटांवर बिबट्या, राधाकृष्ण विखे पाटील यांची पत्नी आणि नातवंडे बचावली

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी विखे पाटील नातवंडांसोबत ऊसाच्या शेतात‌‌ बसल्या असताना बिबट्याने पाच फूट अंतरावर झेप घेतली आणि...

अवघ्या पाच फुटांवर बिबट्या, राधाकृष्ण विखे पाटील यांची पत्नी आणि नातवंडे बचावली
Follow us
| Updated on: Aug 31, 2020 | 7:37 AM

शिर्डी : भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची दोन्ही नातवंडे बिबट्याच्या संभाव्य हल्ल्यातून थोडक्यात बचावली. अहमदनगरमध्ये ऊसाच्या शेतात‌‌ दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक झेप घेतली, मात्र समोर कुत्रा आल्याने विखे पाटील कुटुंब बचावले. (Radhakrishna Vikhe Patil Grand Children had a narrow escape from Leopard Attack)

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील ऊसाच्या शेतात‌‌ नातवंडांसोबत बसल्या होत्या. पुत्र आणि भाजपचे खासदार सुजय विखे यांची सहा वर्षाची मुलगी अनिशा, तसेच कन्या सुस्मिता यांचा सहा वर्षाचा मुलगा जयवर्धन हे शालिनी विखेंसह होते.

शालिनी विखे दुपारी अडीच वाजताच्या सुमारास लोणी येथील शेतात नातवंडांना जेवू घालत होत्या. इतक्यात ऊसातून बिबट्याने त्यांच्याकडे झेप घेतली. बिबट्याला पाहून शालिनी विखे यांच्या काळजात धस्स झाले.

कुत्रा ठरला देवदूत

सुदैवाने तिघांपासून अवघ्या पाच फुटांवर असलेल्या कुत्र्याला जबड्यात पकडले आणि बिबट्या पुन्हा आल्या पावली ऊसात दिसेनासाही झाला. अक्षरशः काळ आला होता पण वेळ आली नव्हती, या म्हणीचे मूर्तिमंत उदाहरण पाहायला मिळते.

कुत्रा मध्ये नसता, तर काय संकट ओढवले असते, या कल्पनेनेही अंगावर शहारा येतो. आपल्या कुटुंबावर आलेले संकट कुत्र्याने स्वतःवर घेतल्याच्या शालिनी विखे यांच्या भावना आहेत.

ही बातमी पसरताच आजूबाजूचे लोक जमा झाले. आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे यांनीही शेताकडे धाव घेतली. या घटनेमुळे वनाधिकाऱ्यांची धावपळ उडाली. मात्र सारे आलबेल असल्याने विखे कुटुंबाने सुटकेचा निश्वास सोडला.

(Radhakrishna Vikhe Patil Grand Children had a narrow escape from Leopard Attack)

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.