AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जे म्हणायचे माँ गंगेने बोलावलं आहे, त्यांनी…; राहुल गांधींचा मोदींना खोचक टोला

गंगा नदीत मृतदेह तरंगताना आढळत आहे. त्यामुळे देशभर संतापाची लाट पसरली आहे. (Rahul Gandhi attacks PM Modi on dead bodies found in ganga)

जे म्हणायचे माँ गंगेने बोलावलं आहे, त्यांनी...; राहुल गांधींचा मोदींना खोचक टोला
Rahul Gandhi
| Updated on: May 15, 2021 | 2:18 PM
Share

नवी दिल्ली: गंगा नदीत मृतदेह तरंगताना आढळत आहे. त्यामुळे देशभर संतापाची लाट पसरली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही त्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. (Rahul Gandhi attacks PM Modi on dead bodies found in ganga)

राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. जे म्हणायेच माँ गंगेने बोलवलं आहे. त्यांनी माँ गंगेला रडवलं आहे, अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांच्या आधी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. गंगा मैय्याने बोलावलं आहे, असं जे म्हणायचे, आज तेच सिंहासनावर बसून जोरजोरात हसत आहेत, अशी टीका सुरजेवाला यांनी केली होती.

सुरजेवालांची टीका

चोहोबाजूंनी 2000 हून अधिक मृतदेह दिसत आहेत. सर्व काही थांबलं आहे. गंगा मैय्याच्या डोळ्यातूनही अश्रू वाहत आहे. तिचाही आकांत सुरू आहे. ज्यांनी भगवे वस्त्र परिधान करून राजसत्ता मिळवली. ते सत्तेच्या नशेत मदमस्त आहेत. आणि जे म्हणायचे गंगा मैय्याने बोलावलं आहे. ते आज सिंहासनावर बसून दात विचकत आहेत, अशी टीका सुरजेवाला यांनी केली आहे.

राजकारण तापलं

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात गंगा नदी किनारी अनेक मृतदेह दिसत आहेत. नदीत मृतदेह तरंगताना दिसत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकारण तापलं असून उत्तर प्रदेश सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं जात आहे.

गरजूंना मदत करा

दरम्यान, देशातील काही भागात तौक्ते चक्रिवादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी या पीडितांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. ज्यांना ज्या ज्या गोष्टींची गरज आहे, त्याची पूर्तता करा, असं राहुल यांनी म्हटलं आहे. केरळ, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, गुजरात आणि कर्नाटकात वादळ येण्याचा अॅलर्ट आहे. या वादळामुळे अनेक ठिकाणी प्रचंड पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी गरजूंना मदत करावी. त्यांना सुरक्षित ठेवून त्यांची काळजी घ्या, असं राहुल यांनी म्हटलं आहे. (Rahul Gandhi attacks PM Modi on dead bodies found in ganga)

संबंधित बातम्या:

तर मुख्यमंत्रीही कोल्हापुरातून आणा, गोव्यातील मृत्यूतांडवानंतर मुख्यमंत्री बदलाची मागणी

भारतात घाई-गडबड नको, अमेरिकेप्रमाणे मास्क हटवण्याचा निर्णय तूर्तास नाही : AIIMS

गंगा नदीत तरंगणारे मृतदेह नाजयेरियाचे; कंगना रनौतचा जावईशोध

(Rahul Gandhi attacks PM Modi on dead bodies found in ganga)

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.