AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नफरत के बाजार में हम मोहब्बत की दुकान खोल रहे है… भारत जोडो यात्रेत राहुल गांधींचं वक्तव्य, आज दिल्लीत लाल किल्ल्यावर धडक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 डिसेंबरपासून कन्याकुमारी येथून सुरु झाली. ही यात्रा आतापर्यंत 9 राज्यांतून प्रवास करत आज दिल्लीत पोहोचली आहे.

नफरत के बाजार में हम मोहब्बत की दुकान खोल रहे है... भारत जोडो यात्रेत राहुल गांधींचं वक्तव्य, आज दिल्लीत लाल किल्ल्यावर धडक
Image Credit source: social media
| Updated on: Dec 24, 2022 | 8:28 AM
Share

नवी दिल्लीः माझ्या यात्रेत तुम्हाला कुठेही द्वेष दिसणार नाही. कारण इथे सगळ्या धर्माचे लोक आहेत. माझं कुणाशीही वैर नाही. पण एका विचारधारेविरोधात संघर्ष सुरु आहे. इथे द्वेषाचा बाजार आहे आणि माझं दुकान प्रेमाचं आहे, असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलं. भारत जोडो यात्रेने (Bharat Jodo Yatra) आज दिल्लीत प्रवेश केला. आज ही यात्रा लाल किल्ल्यावर (Red Fort) धडकणार आहे.

बदरपूर बॉर्डरवरील सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, कधी कधी त्यांचे नेते विचारतात, राहुल गांधी का चालत आहेत? मी विचार केला आणि उत्तर मिळालं. राहुल गांधींनी सगळ्याच भाजप कार्यकर्त्यांना उत्तर दिलं. आपका बाजार द्वेष का, मेरी दुकान प्रेम की…..

तुम्ही माझा द्वेष करा, मला शिव्या द्या. तुमचा बाजार.. महात्मा गांधी, सरदार पटेल, जवाहरलाल नेहरू, आंबेडकर या सर्वांनी द्वेषाच्या बाजारात प्रेमाचं दुकान उघडलं होतं. त्यामुळे या सगळ्या भाजप नेत्यांना मी आज आवाहन करतो.

तुम्हीदेखील या बाजारात या, आपल्या देशात द्वेषात कुणीही जगू नये…अशी माझी इच्छा आहे, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी अलवर येथील सभेत केलं. आज भारत जोडो यात्रेने दिल्लीत प्रवेश केला आहे. ही यात्रा आज लाल किल्ल्यावर धडकणार आहे.

दुपारी 4.30 वाजता ही यात्रा लाल किल्ल्यावर दाखल होईल. कोरोनाचा संसर्गावर आळा घालण्यासाठी यात्रेत सहभागी होणारे नेते आणि कार्यकर्त्यांना मास्क घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हरियाणातील फरीदाबाद येथून एनएचपीसी मेट्रो स्टेशनवरून ही यात्रा सुरु झाली. आजा दुपारी लाल किल्ल्यावर मोठ्या सभेसमोर राहुल गांधींचं भाषण होईल. यानिमित्त वाहतूक पोलिसांनी मोठी तयारी केली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 डिसेंबरपासून कन्याकुमारी येथून सुरु झाली. ही यात्रा आतापर्यंत 9 राज्यांतून प्रवास करत आज दिल्लीत पोहोचली आहे.

तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रे प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा यांचा समावेश आहे. दिल्लीनंतर ही यात्रा पुन्हा एकदा हरियाणात जाईल. ३ जानेवारीनंतर राहुल गांधी पुन्हा हरियाणात जातील.

नव्या वर्षात उत्तर प्रदेश, हरियाणानंतर ही यात्रा पंजाब आणि जम्मू काश्मीरच्या दिशेने रवाना होईल.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.