व्हॉट्सॲप डीपीवर बड्या उद्योजकांचे फोटो ठेवायचे अन् मग… धुमाकूळ घालणारी कुमावत गँग अखेर जेरबंद

काही दिवस संपर्कात राहिल्यानंतर त्याला बरोशा येथे नेले आणि नंतर अंगडियाकडून व्यवसायाच्या नावाखाली 20 लाख रुपये घेऊन पोबारा केला.

व्हॉट्सॲप डीपीवर बड्या उद्योजकांचे फोटो ठेवायचे अन् मग... धुमाकूळ घालणारी कुमावत गँग अखेर जेरबंद
व्हॉट्सॲप डीपीवर बड्या उद्योजकांचे फोटो ठेवायचे अन् मग... Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 24, 2022 | 7:44 AM

मुंबई: मुंबई पोलिसांना एका लुटमारीच्या प्रकरणात मोठं यश आलं आहे. दिंडोशी पोलिसांनी राजस्थानच्या कुमावत टोळीतील 5 जणांना अटक केली आहे. हे पाचहीजण मोठ्या शिताफिने व्यापाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढायचे आणि त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून नंतर त्यांच्याशी संपर्क तोडून टाकायचे. त्यामुळे अनेक व्यापारी या टोळीला फसले गेले होते. या कुमावत टोळीच्या तक्रारीही पोलिसांकडे आल्या होत्या. त्यामुळे राजस्थान आणि महाराष्ट्र पोलिसांच्या रडारवर ही टोळी आली होती. अखेर मुंबई पोलिसांनीच मोठ्या शिताफिने या टोळीला जेरबंद करण्यात यश मिळवलं आहे.

ही टोळी देशातील बड्या उद्योजकांचे किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीचे व्हॉट्सॲप डीपी ठेवत असे. त्यानंतर देशातील इतर राज्यांमध्ये राहणाऱ्या व्यावसायिकांशी फोन करून संपर्क साधत असे. स्वत: व्यावसायिक असल्याचे ही टोळी भासवत असे. काही वेळा बड्या उद्योजकांच्या व्यवसायाच्या नावाचा वापर करून व्यापाऱ्यांना मोठ्या नफ्याची लालच दाखवत असे. त्यामुळे व्यापारीही त्यांच्या जाळ्यात सहज अडकत होते.

हे सुद्धा वाचा

दिंडोशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 डिसेंबर रोजी इंदूर येथील एका व्यावसायिकाने या प्रकरणी तक्रार केली होती. मोठे व्यापारी असल्याचे भासवून काही लोकांनी फोन आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधला.

काही दिवस संपर्कात राहिल्यानंतर त्याला बरोशा येथे नेले आणि नंतर अंगडियाकडून व्यवसायाच्या नावाखाली 20 लाख रुपये घेऊन पोबारा केला. या टोळीने आपला मोबाइल बंद केल्याने त्यांना ट्रेस करता येत नसल्याचं या व्यापाऱ्याने तक्रारीत नमूद केल्याचं दिंडोशी पोलिसांनी सांगितलं.

या घटनेची माहिती मिळताच दिंडोशी पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांद्वारे कुमावत टोळीतील पाच आरोपींना अटक केली. या टोळीने आतापर्यंत किती जणांची फसवणूक केली आहे, याचा तपास सुरू केला आहे.

विक्रम अचलराम कुमावत वय 23 वर्षे, मुकेश तगाराम कुमावत वय 28 वर्षे, हसमुख पुखराज सुराणा वय 52 वर्षे, मोहनलाल कुमावत वय 32 वर्षे आणि विक्रम लालचंद सुराणा वय 47 वर्षे अशी या पाचही आरोपींची नावे आहेत. अटक करण्यात आलेले हे सर्व आरोपी राजस्थानी असून त्यांना मुंबई आणि विरार परिसरातून अटक करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....