Raj Thackeray : पोलिसांनी ‘भोंगा’ सिनेमा चित्रपटगृहातून हटवला! सरकारच बेकायदेशीर काम करतेय, अमेय खोपकरांचा आरोप

राज्यभरातील मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर आता राज्य सरकार मनसेचा 'भोंगा अजान' हा चित्रपटही राज्य सरकार प्रदर्शित होऊ देत नसल्याचा आरोप मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केलाय.

Raj Thackeray : पोलिसांनी 'भोंगा' सिनेमा चित्रपटगृहातून हटवला! सरकारच बेकायदेशीर काम करतेय, अमेय खोपकरांचा आरोप
राज ठाकरेंच्या आदेशातले ते पाच प्रमुख मुद्दे ज्यानं राजकारण ढवळून निघतंयImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 6:47 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक पवित्रा घेतलाय. मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला अल्टिमेटम दिलाय. सरकारनं भोंगे हटवले नाहीत तर त्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावण्याचे आदेशच राज ठाकरे यांनी दिले आहेत. औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरील सभेदरम्यान राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर औरंगाबाद पोलिसांकडून राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज्यभरातील मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर आता राज्य सरकार मनसेचा ‘भोंगा अजान’ हा चित्रपटही राज्य सरकार प्रदर्शित होऊ देत नसल्याचा आरोप मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी केलाय.

‘राज्य सरकार हुकूमशाहसारखं वागतंय’

अमेय खोपकर यांच्या हस्ते ‘भोंगा’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून आजवर हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकला नाही. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. त्याच दिवशी भोंगा सिनेमा प्रदर्शित करण्याची घोषणा खोपकर यांनी केली होती. मात्र, हा सिनेमा सरकार प्रदर्शित होऊ देत नसल्याचा आरोप खोपकर यांनी आज केलाय. ‘राज्य सरकार हुकूमशाहसारखं वागतंय. ‘भोंगा’ चित्रपट थिएटरमधून काढायला लावतायत. पोलिसांना बेगायदेशीर कामं करायला स्वत: गृहखातं सांगतंय’ असं ट्वीट खोपकर यांनी केलं आहे. ‘जो चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित आहे, सेन्सॉर बोर्डाचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे, तो ‘भोंगा’ चित्रपट थिएटरमधून काढायला लावणं, हे पोलिसांच्या कोणत्या अधिकारात बसतं?’ असा सवालही खोपकर यांनी विचारलाय.

हे सुद्धा वाचा

मनसेने निर्मिती केलेला भोंगा हा सिनेमा आज राज्यातील 65 चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. मात्र पोलिसांनी चित्रपट गृह मालकांना फोन करुन चित्रपट प्रदर्शित करु नये, अशा सूचना केल्याचा आरोप अमेय खोपकर यांनी केला आहे.

कसा आहे ‘भोंगा’ सिनेमा?

भोंगा या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन शिवाजी लोटन पाटील यांनी केलं आहे. यामध्ये अभिनेत्री दिप्ती धोत्रे, कपिल गडसुरकर, अमोल कागणे, श्रीपाद जोशी, आकाश घरत, दिलीप डोंबे, अरुण गीते, सुधाकर बिराजदार, रमेश भोळे, दिपाली कुलकर्णी यांच्या भूमिका आहेत. एका कुटुंबातील नऊ महिन्यांच्या बाळाला दुर्धर आजार झालेला असतो. या आजारामुळे बाळाला उच्च ध्वनीचा अधिक त्रास होतो. भोंग्यामुळे या बाळाच्या तब्येतीवर सतत परिणाम होऊन त्याचा त्रास वाढत जातो. हा त्रास संपूर्ण गाव पाहत असतो आणि तो कमी करण्यासाठी ते काय पाऊल उचलतात हे या चित्रपटातून पहायला मिळणार आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.