AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : कुणाला नोटिसा तर कुणाची धरपकड, तर काही अंडरग्राऊंड; पोलीस ॲक्शनमोडमध्ये आल्यानंतर मनसे गनिमीकाव्याच्या तयारीत?

औरंबादच्या सभेत अटी मोडल्यामुळे राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या अटकेचीही शक्यता आहे. पोलिसांनी आता मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. त्यामुळे काही मनसेचे नेते आणि कार्यकर्ते हे नॉटरिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे.

Raj Thackeray : कुणाला नोटिसा तर कुणाची धरपकड, तर काही अंडरग्राऊंड; पोलीस ॲक्शनमोडमध्ये आल्यानंतर मनसे गनिमीकाव्याच्या तयारीत?
राज ठाकरे, मनसे अध्यक्षImage Credit source: TV9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: May 03, 2022 | 6:10 PM
Share

मुंबई : राज्यात पोलिसांनी सध्या मनसे कार्यकर्त्यांविरोधात (MNS) कारवाईचा धडाका सुरू आहे. काहींना नोटीसी बजावल्या आहेत, तर काही मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहे. नोटीसा बजावलेल्यांमध्ये मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव अशा मनसे नेत्यांचा समावेश आहे. राज्यभरात जवळापस 15000 हजार मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा बजावल्याची (Police Notice) माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे औरंबादच्या सभेत अटी मोडल्यामुळे राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या अटकेचीही शक्यता आहे. पोलिसांनी आता मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. त्यामुळे काही मनसेचे नेते आणि कार्यकर्ते हे नॉटरिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई पोलिसांनी राज्यभर सुरू केली आहे. त्यामुळे आता राज्यात हायव्होल्टेज ड्रामा सुरू झाला आहे.

कुणाला नोटीसा, कुणाची धरपकड?

  1. मुंबईत बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना पोलिसांकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
  2. भोंग्यांविरोधात सर्वप्रथम हनुमान चालीसा वाजविणारे चांदीवली मनसे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांना घाटकोपर, चिरागनगर पोलिसांकडून बर्वेनगर स्मशानभूमी येथून अटक केली आहे. तसेच त्यांच्या कार्यालयातून भोंगेही जप्त केले आहे.
  3. पुण्यातील काही प्रमुख मनसे पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजवल्याचीही माहिती समोर आली आहे. शिवाय पदाधिकाऱ्यांना पुणे पोलिसांचे फोन गेल्याचीही माहिती समोर आली आहे. तसेच प्रमुख पदादाधिकाऱ्यांना अटक करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनसे कार्यकर्त्यांना नोटीस द्यायला सुरुवात झाल्यानंतर पुण्यातील अनेक मनसेचे नेते नॉटरिचेबल आहेत.
  4. मात्र उद्याच्या अल्टीमेटमवर मनसैनिक ठाम आहे अशी प्रतिक्रिया मनसेकडून देण्यात आली आहे. राज ठाकरेंचा आदेश आमच्यासाठी महत्वाचा आहे. अशी शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांची भूमिका आहे. नोटीसा दिल्या तरी राज ठाकरे जे सांगतील ते आम्ही करणार, असे साईनाथ बाबर म्हणाले आहेत.
  5. पिंपरी चिंचवड मधील मनसेच्या शहराध्यक्ष सह प्रमुख 30 ते 40 कार्यकर्त्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी सीआरपीसी 149 प्रमाणे नोटिसा दिल्या असल्याचीही माहिती समोर आली आहे. तर इथलेही कार्यकर्ते राज ठाकरेंच्या आदेशावर ठाम आहेत.
  6. उस्मानाबाद पोलीसही एक्शन मोडमध्ये आले आहेत.मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पोलिसांच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. CRPC 1973 चे कलम 149 प्रमाणे मनसे पदाधिकऱ्यांना पोलिसांनी लेखी नोटीस दिल्याची माहिती समोर आली आली आहे. विनापरवाना भोंगा / स्पीकर लावून नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आलाय.
  7. “कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही, आणि कायद्याच्या वर जाऊन कुणी काही करत असेल, तर कारवाई व्हायला हवी” मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.
  8. अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत असतात,आमच्यावरही झालेत. व्यक्ती कितीही मोठी असू द्या, कायद्याचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल होतात. अशी सूचक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
  9. सरकारची भूमिका आहे की मनसेवर दबाव निर्माण करायचा. जेव्हा अटी टाकल्या होत्या तेव्हाच आम्हाला काळाल होतं. आम्ही घाबरत नाही संघर्ष करत राहणार. आम्ही कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढली आहे. भोंग्यासंदर्भात राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करु, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
  10. तर नवनीत राणा, राज ठाकरे आणि नारायण राणे म्हणजे ट्रिपल आर चित्रपट असल्याची टीका मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहेत. तर पोलीस तयारीत आहेत, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
  11. पुण्यातील शिरूरमधील मनसेचा कार्यकर्ता 10 दिवसासाठी तडीपार करण्यात आला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी काढले तडीपारचे आदेश काढले आहेत. नानासाहेब लांडे असं मनसैनिकाचं नावं असल्याची माहिती समोर आली आहे

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर