AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरेंच्या आवाहनामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला; वकिलाची पोलिसात तक्रार

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मास्क न घालण्याच्या आवाहनामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला, असं तर्कट लावत अॅड. रत्नाकर चौरे (Adv Ratnakar Chaure) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

राज ठाकरेंच्या आवाहनामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला; वकिलाची पोलिसात तक्रार
राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
| Updated on: Mar 07, 2021 | 3:47 PM
Share

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मास्क न घालण्याच्या आवाहनामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला, असं तर्कट लावत अॅड. रत्नाकर चौरे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. औरंगाबादच्या क्रांतीचौक पोलिस ठाण्यात राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. (Raj Thackeray appeal causes Corona to grow, Advocate Ratnakar Chaure Complaint Aurangabad Police)

राज ठाकरेंच्या आवाहनामुळे कोरोना वाढला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांच्या कॅमेरासमोर मी मास्क घालतच नाही, असं वक्तव्य केलं होतं. तसंच नाशिकच्या दौऱ्यात माजी महापौर अशोक मुर्तडक यांना चेहऱ्यावरील मास्क उतरवण्यास सांगितलं होतं. एकूणच राज ठाकरे यांच्या मास्क न घालण्याच्या आवाहनामुळे राज्यात कोरोना वाढला असं म्हणत अॅड. रत्नाकर चौरे यांनी औरंगाबादच्या क्रांतीचौक पोलिस ठाण्यात राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

कोरोनाच्या संकटकाळात राज्य शासन प्रशासन कोरोनाचे नियम पाळण्याविषयी जनजागृती करत आहे तसंच नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्यास सांगत आहे. अशा काळात एखादा जबाबदार नेता अशा प्रकारचं आवाहन करतो, तर लोक त्याला का फॉलो करणार नाहीत, असा प्रश्न यानिमित्ताने त्यांनी उपस्थित केला.

‘साहेब आपण मोठे नेते, लोकं तुम्हाला मानतात, आपण मास्क घाला’

दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो (NCP Spokeperson Clyde Crasto) यांनीही राज ठाकरे यांना याचविषयी पत्र लिहिलं आहे. राजसाहेब आपण मास्क घाला, लोकं तुम्हाला मानतात, अशा आशयाचं पत्र त्यांनी लिहिलं आहे.

राजसाहेब आपण जाणते नेते आहात. लोक तुम्हाला लोक मानतात, तुम्ही लोकांसाठी प्रेरणा आहेत पण असे वागू नका. कोरोना संसर्गाचा हा काळ सुरु असताना आपण मास्क परिधान करा, असंही क्लाईड यांनी राज ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

राज ठाकरे विनामास्क नाशकात, ‘मास्क काढ’, माजी महापौरांना इशारा

राज ठाकरे कोरोनासंबंधी नियम पायदळी तुडवत विनामास्क फिरताना दिसतात. मी मास्क लावणार नाही, हा त्यांचा अट्टाहास याआधीही पाहायला मिळाला आहे. मात्र नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी मनसेचे नेते आणि माजी महापौर अशोक मुर्तडक यांनाही मास्क हटवण्यास सांगितल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले.

‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबईत दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी तोंडाला मास्क लावले नव्हता. यावेळी ‘तुम्ही मास्क घातलेला नाही’, असं पत्रकारांनी विचारल्यावर ‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलं होतं. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी ‘त्यांना माझा नमस्कार सांगा,’ असे उत्तर दिले होते.

राज ठाकरेंकडून नियमांची पायमल्ली

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, असं आवाहन सरकार करत आहे. मात्र राज ठाकरे यांनी कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून आतापर्यंत तोंडाला मास्क लावलेला दिसला नाही. साहजिकच राज ठाकरेंच्या तोंडाला मास्क नसलं की लोकांच्यामध्ये चर्चा रंगते.

(Raj Thackeray appeal causes Corona to grow, Advocate Ratnakar Chaure Complaint Aurangabad Police)

हे ही वाचा :

VIDEO | राज ठाकरे विनामास्क नाशकात, मास्क काढ, माजी महापौरांना सूचना

मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय; राज ठाकरे यांनी ‘दादू’चं ऐकायचंच नाही, असं ठरवलंय का?

मास्कबद्दल प्रश्न, राज ठाकरे म्हणाले, कोरोना इतकाच वाढत असेल तर निवडणुकाही पुढे ढकला!

गोवा विधानसभा निवडणुकीत 20-25 जागांवर लढणार; संजय राऊत यांची घोषणा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.