गोवा विधानसभा निवडणुकीत 20-25 जागांवर लढणार; संजय राऊत यांची घोषणा

पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिल्यानंतर आता शिवसेनेने गोवा विधानसभा निवडणुकीकडे मोर्चा वळवला आहे. (Shiv Sena will contest 25 seats in Goa assembly elections, says Sanjay Raut)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:26 PM, 7 Mar 2021
गोवा विधानसभा निवडणुकीत 20-25 जागांवर लढणार; संजय राऊत यांची घोषणा
Sanjay Raut

पणजी: पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिल्यानंतर आता शिवसेनेने गोवा विधानसभा निवडणुकीकडे मोर्चा वळवला आहे. गोव्यात शिवसेना 20 ते 25 जागांवर लढणार असल्याची घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे गोव्यात भाजपची कोंडी होणार असल्याचं दिसून येत आहे. (Shiv Sena will contest 25 seats in Goa assembly elections, says Sanjay Raut)

शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. गोव्यात शिवसेना लढणार आहे. आम्ही गोव्यातील 20 ते 25 जागांवर लढणार आहे, असं राऊत यांनी आज स्पष्ट केलं. स्वबळावर लढल्याने पक्षाचा विस्तार होईल, असंही त्यांनी सांगितलं.

गोव्याची राजकीय स्थिती

गोवा विधानसभेच्या एकूण 40 जागा आहेत. पुढील वर्षी गोवा विधानसभेच्यान निवडणुका होणार आहेत. गोव्यात एकूण दहा मुख्य राजकीय पक्ष आहेत. तिथे शिवसेनाही गेल्या अनेक वर्षांपासून गोवा विधानसभा निवडणुका लढवत आहे. महाराष्ट्राबाहेर पक्षाचा विस्तार करण्यासाठी आणि भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेना नेहमीच गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत असते. सध्या गोव्यात भाजपचं सरकार आहे. गोव्यात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असला तरी भाजपने मित्रपक्षांसोबत आघाडी बनविण्यात बाजी मारल्याने काँग्रेसला सत्तेपासून वंचित राहावं लागलं आहे.

बिहार, बंगालनंतर गोव्यावर नजर

शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणुकीतही उमेदवार उतरवले होते. बिहारमध्ये शिवसेनेच्या उमदेवारांचं डिपॉझिटही जप्त झालं होतं. त्यानंतर शिवसेनेने पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपला फायदा होऊ नये आणि राज्यात पुन्हा ममता बॅनर्जी यांचं सरकार यावं म्हणून शिवसेनेने हा निर्णय घेतला होता. त्यावर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी जोरदार टीकाही केली होती.

पक्षीय बलाबल

एकूण जागा- 40
काँग्रेस- 17
भाजप- 13
महाराष्ट्र गोमंतक पार्टी- 3
अपक्ष – 3
गोवा फॉरवर्ड पार्टी- 3
राष्ट्रवादी – 1  (Shiv Sena will contest 25 seats in Goa assembly elections, says Sanjay Raut)

 

संबंधित बातम्या:

आकडा फायनल झाल्यावर शिवसेनाही नाणारला पाठिंबा देईल; नितेश राणेंचा गंभीर आरोप

पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप; माजी रेल्वे मंत्र्याचा भाजपमध्ये प्रवेश

तृणमूल काँग्रेसला सर्वात मोठं खिंडार?, नाराज 76 नेते मुकुल रॉय यांना भेटले; भाजप प्रवेशाची शक्यता

(Shiv Sena will contest 25 seats in Goa assembly elections, says Sanjay Raut)