
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरे गट मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आंदोलन करत आहे. आजही दोन्ही पक्षांनी मिरा भाईंदरमध्ये आंदोलन केले. त्यानंतर आता राज ठाकरे राज ठाकरे यांनी पक्षातील नेत्यांना स्पष्ट आदेश दिला आहे. माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाही असं ठाकरे यांनी नेत्यांना ठणकावून सांगितले आहे.
राज ठाकरेंचे ट्वीट
राज ठाकरेंनी याबाबत ट्वीट करत म्हटले की, एक स्पष्ट आदेश… पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही.
एक स्पष्ट आदेश… पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही.
आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे…
— Raj Thackeray (@RajThackeray) July 8, 2025
पुढे बोलताना राज ठाकरेंनी, माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही असा आदेश दिला आहे.
राज आणि उद्धव ठाकरे हे वरळीतील कार्यक्रमात एकत्र आले होते, तेव्हापासून युतीच्या चर्चा आणखी वाढल्या आहेत. मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. तसेच राज्यात मराठी विरुद्ध अमराठी असा वादही सुरु आहे. मनसे या दोन्ही मुद्द्यांच्या केंद्रस्थानी आहे. राज आणि उद्धव ठाकरे हे वरळीतील कार्यक्रमात एकत्र आले होते, तेव्हापासून युतीच्या चर्चा आणखी वाढल्या आहेत. याबाबत अनेक कार्यकर्त्यांनी दोन्ही पक्षांची युती व्हावी असं विधान केलं होत, त्यामुळे आता राज ठाकरेंनी याबाबतची चर्चा थांबवण्यासाठी कार्यकर्त्यांना आदेश दिला असल्यची शक्यता नाकारता येत नाही.
त्याचबरोबर, मराठी विरुद्ध अमराठी वादाबाबतही मनसेच्या नेत्याकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे, त्यामुळेच राज ठाकरे यांनी नेत्यांना माध्यमांशी न बोलण्याचा आदेश दिला असल्याची चर्चा सुरु झाली आहे.