AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : देशमुखांची कसून चौकशी करा, आणखी कुणाला किती द्यायला सांगितले?- राज ठाकरे

राज ठाकरे यांनी या प्रकरणी अत्यंत धक्कादायक गौप्यस्फोट केला. (Raj Thackeray demand Anil Deshmukh investigation)

VIDEO : देशमुखांची कसून चौकशी करा, आणखी कुणाला किती द्यायला सांगितले?- राज ठाकरे
राज ठाकरे अनिल देशमुख
| Updated on: Mar 21, 2021 | 12:40 PM
Share

मुंबई : “गृहमंत्र्याने एखाद्या पोलीस आयुक्ताला दर महिन्याला 100 कोटी रुपये मागितले असा आरोप पोलीस आयुक्तांनी केल्याची घटना ही राज्याच्याच काय तर देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल. ही घटना लज्जास्पद आहे.’जर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना 100 कोटी रुपये मागत असतील तर राज्यातील इतर शहरातील किती आयुक्तांकडे किती मागितले ह्याचा तपशील पण कळला पाहिजे,” असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. (Raj Thackeray demand Anil Deshmukh get investigated on parambir singh letterbomb)

मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुखांवरच आरोप केले होते. देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटींची वसुली करण्यास सांगितलं होतं, असं सिंग यांनी म्हटलं होतं. त्यानंतर राज ठाकरे यांनी ट्विट करून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. राज ठाकरे यांनी या प्रकरणी अत्यंत धक्कादायक गौप्यस्फोट केला.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? 

“मला जे आता बोलायचे ते बोलून झाल्यावर मी कोणत्याही प्रश्नांना उत्तर देणार नाही. ते माझ्या निवेदनात असेल. का देऊ शकणार नाही किंवा का इच्छा नाही हे पण निवेदनात असेल. कारण प्रश्न विचारल्यावर अनेक विषय निघतात आणि मूळ विषय निघून जातो. त्यामुळे इतर विषयांना मी हात घालणार नाही,” असे राज ठाकरे म्हणाले.

“गृहमंत्र्याने एखाद्या पोलीस आयुक्ताला दर महिन्याला 100 कोटी रुपये मागितले असा आरोप पोलीस आयुक्तांनी केल्याची घटना ही राज्याच्याच काय तर देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल. ही घटना लज्जास्पद आहे. ‘जर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना 100 कोटी रुपये मागत असतील तर राज्यातील इतर शहरातील किती आयुक्तांकडे किती मागितले ह्याचा तपशील पण कळला पाहिजे,” अशी मागणी राज ठाकरेंनी केली.

“ही घटना लज्जास्पद आहे. अशी घटना महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या इतिहासात घडली नाही. एक वर्षे झाले म्हणून 1200 कोटी द्यायला हवी असेल. पण लॉकडाऊनमुळे बार बंद होते. त्यामुळे ही वसुली झाली नसेल. राज्यात शहरं किती पोलीस कमिशनर किती त्यांना काय टार्गेट दिला हे अजून बाहेर आलं नाही. गृहमंत्र्यांची कसून चौकशी होणं गरजेचं आहे. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे,” असेही राज ठाकरेंनी सांगितले.

जर ते दोषी होते तर मग त्यांना निलंबित का नाही केलं?

“बॉम्ब अतिरेकी ठेवतात हे ऐकलं होतं, पण पोलीस बॉम्ब ठेवतात हे ऐकलं नव्हतं किंवा पाहिलं नव्हतं. मुळात परमबीर सिंग यांना त्यांच्या पदावरून का हटवलं, जर ते दोषी होते तर मग त्यांना निलंबित का नाही केलं? त्यांची चौकशी का नाही केली गेली? त्यांची बदली का केली गेली?  मुळात मुकेश अंबानींच्या घराच्या बॉम्बची गाडी ठेवली गेली हा मूळ विषय आहे तो विषय मागे पडला आहे? त्या गाडीत सापडलेलं जिलेटीन कुठून आलं? ह्याची उत्तरं अजून का नाही मिळाली?” असेही राज ठाकरे म्हणाले.

“त्यांच्या घराबाहेर बॉम्बची सापडते आणि ती गाडी पोलिसानी ठेवली असा आरोप आहे, मुळात अशी घटना कोणीतरी वरिष्ठांच्या सांगण्याशिवाय होऊ शकतं? ही गाडी कोणाच्या सांगण्यावरून ठेवली गेली ह्याचा तपास करण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा,” अशी मागणी राज ठाकरेंनी केली.

“केंद्राने सखोल चौकशी करायला हवी” 

“सचिन वाझे ख्वाजा युनूस प्रकरणात निलंबित होते, मग फडणवीस म्हणतात त्या प्रमाणे सचिन वाझे ह्यांना सेवेत परत घ्या म्हणून उद्धव ठाकरे मागे लागले होते, हेच वाझे शिवसेनेत होते आणि मुकेश अंबानी आधी उद्धव ठाकरे हे घनिष्ट मित्र आहेत. या प्रकरणाची केंद्राने सखोल चौकशी करायला हवी कारण जशी चौकशी पुढे जाईल तशा फटक्यांची माळ लागेल आणि अनेक धक्कादायक नावं बाहेर येतील,” असेही राज ठाकरे म्हणाले

राज्यात निष्पक्ष तपास होईल याची खात्री नाही

“जगातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून मुंबई पोलीस दल ओळखलं जातं, त्या पोलीस दलाला बॉम्बची गाडी एका उद्योगपतीच्या घराबाहेर ठेवायला सांगणं हे भयंकर आहे. ह्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेऊन राजीनामा द्यायला हवा. आणि त्यांची चौकशी व्हायलाच हवी. माझी माध्यमांना विनंती आहे की त्यांनी हा विषय गंभीर आहे ह्याची जाणीव ठेवून तो विषय भरकटू देऊ नये, आणि हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून केला ह्याच्या मागे लागावं,” असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला.

“माझी केंद्र सरकारला विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करायला हवी. कारण या प्रकरणाचा राज्यात निष्पक्ष तपास होईल याची मला अजिबात खात्री नाही. जर केंद्राने पण नीट चौकशी नाही केली, तर मात्र जनतेचा विश्वास कायमचा उडेल. आणि आपण अराजकाच्या दिशेने जाऊ,” असेही राज ठाकरे म्हणाले.

चौकशी व्यवस्थित होऊ द्या

“सरकार बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लागू करा हे राजकीय मुद्दे आहेत.ह्यात आत्ता नको पडूया. ह्याची चौकशी व्यवस्थित होऊद्या. कारण चौकशी व्यवस्थित झाली नाही तर उद्या प्रत्येकाच्या घराबाहेर अशा गाड्या उभ्या राहतील.पोलिसांना हे कृत्य करायला लावणारे कोण हे आधी कळू द्या,” असेही राज ठाकरेंनी सांगितले. (Raj Thackeray demand Anil Deshmukh get investigated on parambir singh letterbomb)

संबंधित बातम्या : 

परमबीर सिंगची बदली का केली, चौकशी का केली नाही? राज ठाकरेंचा सवाल

सचिन वाझेंना शिवसेनेत आणणारा ‘तो’ नेता कोण; राज ठाकरेंचा थेट सवाल

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ