AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक वडील म्हणून राज ठाकरे यांनी ‘त्या’ प्रश्नावर दिलं ‘असं’ उत्तर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज एका मुलाखतीत मुलगा अमित ठाकरे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मिश्किल शब्दांत उत्तर दिलं. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या आठवणींना देखील उजाळा दिला.

एक वडील म्हणून राज ठाकरे यांनी 'त्या' प्रश्नावर दिलं 'असं' उत्तर
| Updated on: Mar 21, 2023 | 10:20 PM
Share

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज एक दिलखुलास मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांना यावेळी बाळासाहेब ठाकरे किंवा वडिलांकडून व्यंगचित्र खूप छान झालंय, अशी कौतुकाची थाप मिळाली आहे का? असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर “स्तुती फार करायचे नाहीत. पण मला त्यांच्या चेहऱ्यावरुन कळायचं”, असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी तुम्हीपण मुलगा अमितची स्तुती करत नाहीत, अशी तक्रार येते असं मुलाखतीत बोलताच राज ठाकरे म्हणाले, “चांगली गोष्ट आहे. मला असं वाटतं की, आपल्याला कळलं पाहिजे की चांगलं होतंय की नाही. उगाच चांगलं बोललं आणि शेफारलं तर”, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.

तुम्ही व्यंगचित्रकार आणि राजकारण असे का निवडले? संगीत आणि राजकारण असे का नाही निवडले? असा प्रश्न राज ठाकरे यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरेंनी, मला संगीतचा कान आहे. मी खूप ऐकलंय. मी जगभरातील संगीत ऐकतो. माझ्या वडिलांनी माझं नाव स्वराज ठेवलं. माझ्या बहिणीचे नाव जयवंती ठेवलं तो एक संगीतातील राग आहे. पण नंतर त्यांना कळलं की यांच्याकडून काही होणार नाही. जेव्हा बाळासाहेब व्यंगचित्र काढायला बसायचे तेव्हा ऐकून पाहून माझ्यावर खूप संस्कार झाले. आणि ते पुढे करावे असं मला वाटलं आणि मी म्हणून जे जे आर्ट्सला गेलो. मला व्यंगचित्रकार व्हायचे होते. पण त्याचा बाप माझ्याच घरात बसला होता. म्हणून मी कॉलेज सुद्धा सोडले”, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

‘मी अपघाताने राजकारणात’

“मी अपघाताने राजकारणात आलो. मला आताचे राजकारण खूप मिसकरेक्ट वाटतं. महाराष्ट्रात असे इतके घाणेरडे राजकारण कधीच पाहिले नाही. त्यामुळे या सगळ्याचा वीट आला आहे. कोणीही काहीही बोलतोय. ज्या महाराष्ट्राने देशाचे प्रबोधन केले त्या महाराष्ट्राला अशी वेळ आली आहे. मागे एकदा पुण्यात माझे व्याख्यान झाले. तेव्हा मला एक हाक ऐकू आली. 1995 च्या अगोदरचा महाराष्ट्र आणि 1995 नंतरचा महाराष्ट्र”, असं राज ठाकरे म्हणाले.

“1995 नंतर भारतात चॅनल इंटरनेट असं सगळं येत गेलं आणि त्यामुळे राजकारण चळवळी अशा अनेक गोष्टींमधून सुशिक्षित वर्ग यातून बाहेर पडला आणि त्यामुळे श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दुवा हरवून गेला. 1995 च्या आधीचा सर्व काळ काढा. कोणतीही राजकीय चळवळ घ्या. त्यात मध्यमवर्गीय आणि सामान्य असाच लोकवर्ग होता. आणि तोच श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दुवा होता”, असंदेखील राज ठाकरे यावेळी म्हणाले.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.