AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्याला इथे कुरळे केसं आहेत, सालं उलटं झालंय का… आधी ठोकले नंतर राज ठाकरेंना हसूच आवरेना

Raj Thackeray Speech : मनसे प्रमुख राज ठाकरे आणि जैन मुनी निलेशचंद्र यांच्यात पांढऱ्या पट्टीच्या वादावरून शा‍ब्दिक चकमक सुरू आहे. यावर बोलताना ठाकरे यांनी मुनींच्या केसांवर भाष्य केले आहे.

त्याला इथे कुरळे केसं आहेत, सालं उलटं झालंय का... आधी ठोकले नंतर राज ठाकरेंना हसूच आवरेना
Raj Thackeray and Jain MuniImage Credit source: Google
| Updated on: Jun 20, 2026 | 9:04 PM
Share

मुंबईतील दादर येथील पांढऱ्या पट्टीच्या वादावरून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि जैन मुनी निलेशचंद्र यांच्यात शा‍ब्दिक चकमक सुरू आहे. मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी जैन मुनी निलेशचंद्रन यांच्यावर टीका केली आहे. जैन मुनींच्या कुरळ्या केसांवर बोलताना राज ठाकरेंना हसू अनावर झालं. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

राज ठाकरेंचे जैन मुनींच्या केसावर भाष्य

आपल्या भाषणात पांढऱ्या पट्ट्या आणि जैन मुनींवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘काही जैन चांगले काम करत असतील. पण, एक जण कोण आहे भाजपचा? त्याला मुनी पण म्हणत नाहीत. कुरळ्या केसाची दाढी घेऊन फिरतो. त्याला (दाढीला हात लावत) इथे कुरळे केस आले. सालं उलटं झालं की काय सालं.(राज ठाकरेंना हसू अनावर) तो म्हणतो आम्ही हातात बांगड्या नाही भरल्या. मराठी माणसाचं मनगट पाहिलं आहे का कधी? आम्हाला कोणता वाद नको, भांडण नको आहे, पण जर कुणी वाद उकरून काढणार असाल तर आम्ही रस्त्यावर उभे राहू.’

तुमच्या मनगटात किती दम हे महाराष्ट्र ओळखतो

राज ठाकरेंच्या या टीकेनंतर आता जैन मुनी निलेशचंद्रन यांनीही आक्रमत पवित्रा घेत उत्तर दिले आहे. ‘हा वाद केवळ व्होट बँकेसाठी असून तुमच्या मनगटात किती दम आहे हे महाराष्ट्र ओळखतो. मंत्रालयात बसणारा राम आहे आणि त्याचा हनुमान महाराष्ट्रात आहे. जे लोक भगव्याला हिरवं करण्याचा विचार ठेवतात, त्यांना सरळ करायला हनुमान समर्थ आहे. माझ्या समाजाला जिथे गरज पडेल, तिथे मी लढायला तयार आहे असं जैन मुनी यांनी म्हटलं आहे.

जे मोदींचे विरोधक ते माझे विरोधक

पुढे बोलताना जैन मुनी म्हणाले की, “माझे केस वाकडे की फिकडे, हा माझा प्रश्न असून मी कुणाला उत्तर देण्यास बांधील नाही. जे मोदी आणि योगींचे विरोधक आहेत, तेच माझे विरोधक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दादरमधील कबुतरांचा वाद राजकीय नेत्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी उकरून काढल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.

Follow Us
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
Uddhav Thackeray | विश्वासू खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त...
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
kalyan | कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव... मुख्यमंत्र्यांनी सूत्रसंचालकाला मध्येच अडवलं अन्...
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
Uddhav Thackeray | 6 बंडखोर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा घराबाहेर गराडा; पुण्यातील राजकीय हालचालींना वेग
परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला
Parbhani| परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला, अनेकजण जखमी
शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
Amit Shah | शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम...
Omraje Nimbalkar | शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम निर्णय घेणार!
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी... राजकारणातील घडामोडींना वेग