आदित्यसाठी राजकाका भावूक, ठाकरे कुटुंबियांत चर्चा, वरळीत मनसेचा उमेदवार नाही?

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray Raj Thackeray) यांच्या रुपाने ठाकरे कुटुंबाचा पहिला सदस्य निवडणुकांच्या रिंगणात उतरला आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray Raj Thackeray) वरळी विधानसभेतून नशीब आजमावत आहे.

raj thackeray supports aaditya thackeray, आदित्यसाठी राजकाका भावूक, ठाकरे कुटुंबियांत चर्चा, वरळीत मनसेचा उमेदवार नाही?

(फाईल फोटो)

मुंबई : आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray Raj Thackeray) यांच्या रुपाने ठाकरे कुटुंबाचा पहिला सदस्य निवडणुकांच्या रिंगणात उतरला आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray Raj Thackeray) वरळी विधानसभेतून नशीब आजमावत आहे. मात्र आता काका मनसे अध्यक्ष राज ठाकरे (No MNS Candidate in Worli) यांची अप्रत्यक्ष साथ लाभली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनसे वरळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढणार नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

वरळीत आदित्य ठाकरे शिवसेनेचे उमेदवार असल्याने हा निर्णय घेतला आहे. ठाकरे कुटुंबीयामध्ये चर्चा झाल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. राज ठाकरे 5 तारखेला मनसेच्या प्रचाराच्या पहिल्या सभेत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

ठाकरे घराण्यातील पहिला ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे पुतण्या आदित्य यांच्या संसदीय राजकारणासाठी काका राज भावनिक झाल्याचं पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळीतील लढत आणखी सोपी होण्याची चिन्हं आहेत.

मनसेचे 27 उमेदवार जाहीर

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं आहे. 27 उमेदवारांची पहिली यादी मनसेने जाहीर केली. मात्र पहिल्या यादीत वरळीत उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे आदित्य ठाकरेंविरोधात मनसेकडून उमेदवार दिला जाणार नसल्याची (No MNS Candidate in Worli) शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादी काय भूमिका घेणार?

खरं तर, सुप्रिया सुळे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. याची जाण ठेवत आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देण्यास शरद पवार सकारात्मक होते. मात्र लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांचा पराभव करणारा शिवसेनेचा उमेदवार असल्यामुळे अजित पवार हे काकांच्या निर्णयावर समाधानी नसल्याचं म्हटलं जात होतं.

दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत हे सुद्धा शरद पवारांच्या भेटीला गेले होते. त्यावेळी संजय राऊतांनीही आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीबाबत पवारांशी चर्चा करुन वाटाघाटी केल्याची चर्चा होती.

संबंधित बातम्या 

ठाकरे घराण्याला इतिहास रचण्यासाठी राज ठाकरेंची साथ? 

आदित्य ठाकरेंचा मावसभाऊ वरुण सरदेसाई निवडणुकीच्या रिंगणात?  

मनसेच्या ‘डॅशिंग’ नेत्या रुपाली पाटील उमेदवारी डावलल्याने आक्रमक 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *