Raj Thackeray new Look : राज ठाकरेंचा आणखी एक नवा लूक समोर

मुंबईतील 'द लीला' या पंचतारांकित हॉटेलमध्ये होत असलेल्या एका विवाह सोहळ्याला राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी राज ठाकरे यांचा नवा लूक दिसून आला.

Raj Thackeray new Look : राज ठाकरेंचा आणखी एक नवा लूक समोर
Raj Thackeray new look

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे  (Raj Thackeray new Look )यांनी आणखी एक नव्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मनसेच्या सरचिटणीस आणि राज ठाकरे कुटुंबियांच्या निकटवर्तीय रिटा गुप्ता यांचे चिरंजीव हर्ष गुप्ता यांचं आज लग्न आहे. मुंबईतील ‘द लीला’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये होत असलेल्या या विवाह सोहळ्याला राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी राज ठाकरे यांचा नवा लूक दिसून आला.

कसा आहे नवा लूक?

राज ठाकरे यांनी नेहमीचा कुर्ता पायजमा घातला आहे. मात्र यावेळी पांढऱ्या रंगाच्या कुर्ता पायजम्यावर त्यांनी शाल घेतली आहे. बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन हे अनेकदा अशा वेशभूषेत दिसले होते. काहीसा तसाच पेहराव राज ठाकरे यांनी परिधान केला आहे. शिवाय डोळ्याला गॉगल आणि पायात मोजडी असा राज ठाकरेंचा लूक लक्ष वेधत आहे.

Raj Thackeray new look

Raj Thackeray new look

राज ठाकरेंचा यापूर्वीचे लूक 

राज ठाकरे हे यापूर्वी वेगवेगळ्या लूकमध्ये दिसले होते. काही वर्षांपूर्वी ते फ्रेंच बियर्डमध्ये दिसले होते. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच त्यांचा हा लूक समोर आला होता. त्यावेळी गॉगल आणि टीशर्ट घातलेला राज ठाकरे यांचा फोटो समोर आला होता. राज ठाकरे यांच्या या नव्या फोटोत त्यांची वाढलेली दाढी दिसत होती.

हातात चहाचा कप, डोळ्यावर गॉगल, स्पोर्टसमन लूक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा टेनिस खेळतानाचा एक लूक समोर आला होता. मुलगा आणि मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासोबत त्यांनी टेनिसमध्ये हात आजमवला होता. त्यानंतर खुर्चीवर बसून हातात चहाचा कप, डोळ्यावर गॉगल असा स्पोर्ट्समन लूकची चर्चा होती.

कपाळावर टिळा

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात मुंबईत मनसेचे महाअधिवेशन झाले होते. त्यावेळीही राज ठाकरे यांच्या लूककडे सर्वांचे लक्ष लागले होते. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात फेब्रुवारी महिन्यात मनसेने मोर्चाचे आयोजन केलं होतं. राज ठाकरे यांनी या मोर्चासाठी पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता. तर कपाळाला भगव्या रंगाचा टिळा लावला होता. मनसेचा नवा झेंडा असलेला बॅच उजव्या हाताला बांधला होता. राज ठाकरेंनी पांढऱ्या आणि करड्या रंगाचे शूज घातले होते. मात्र या शूजच्या लेसचा रंगही भगवा होता.

धोतर लूक 

राज ठाकरे केवळ कुर्ता-पायजमा किंवा जीन्स टी शर्ट नव्हे तर धोतर झब्ब्यातही पाहायला मिळाले होते. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीवेळी पक्षांच्या बैठका सुरु होत्या, त्यावेळी राज ठाकरे चक्क धोतर कुर्त्यात दिसले होते.

राज ठाकरेंचा ‘पेटंट’ लूक

राज ठाकरे यांचं व्यक्तिमत्व तरुणांमध्ये प्रचंड आकर्षणाचं आहे. राज ठाकरेंच्या स्टाईल स्टेटमेंटचा मोठा चाहतावर्ग आहे. मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे हे बहुतेकवेळा करड्या रंगाची पँट, व्हाईट शर्ट यामध्ये दिसत होते. त्यावेळी राज ठाकरेंच्या या लूकचा ट्रेंड बऱ्याच काळासाठी राहिला. कडक इस्त्रीचा पांढरा शर्ट इन करुन, हलक्या लाल रंगाच्या चष्म्याच्या फ्रेममधून भेदक नजर असा राज ठाकरेंचा लूक चर्चेत होता.

संबंधित बातम्या  

Raj Thackeray | टीशर्ट-गॉगल आणि दाढी, राज ठाकरे यांचा न्यू लूक

Dashing Raj Thackeray | हातात चहाचा कप, डोळ्यावर गॉगल, स्पोर्ट्समन राज ठाकरेंचा टेनिस कोर्टातील रुबाबदार फोटो व्हायरल

Raj Thackeray Tennis | टेनिसचा आनंद लुटताना ‘राज’स मुद्रा, राज ठाकरेंचा नवा फिटनेस फंडा

Published On - 2:09 pm, Wed, 11 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI