AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray | टीशर्ट-गॉगल आणि दाढी, राज ठाकरे यांचा न्यू लूक

गॉगल आणि टीशर्ट घातला असतानाचा राज ठाकरे यांचा फोटो समोर आला आहे. राज ठाकरे यांच्या नव्या फोटोत त्यांची वाढलेली दाढी दिसत आहे.

Raj Thackeray | टीशर्ट-गॉगल आणि दाढी, राज ठाकरे यांचा न्यू लूक
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Aug 30, 2020 | 7:21 PM
Share

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी नवनवीन लूक आजमावून पाहिले. अगदी सर्वसामान्यांपासून कलाकारांपर्यंत बऱ्याच जणांनी घरच्या घरी हटके अंदाज केला. नेते मंडळीही याला अपवाद ठरलेले नाहीत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही एक ‘कूल लूक’ समोर आला आहे. (MNS Chief Raj Thackeray New Look)

लॉकडाऊनमध्ये सलून बंद असताना कोणी वाढलेल्या केसांची अनोखी स्टाईल केली, तर कोणी घरच्या घरी केसांना कात्री लावली होती. कोणी दाढीला नवा आकार दिला. गॉगल आणि टीशर्ट घातला असतानाचा राज ठाकरे यांचा फोटो समोर आला आहे. राज ठाकरे यांच्या नव्या फोटोत त्यांची वाढलेली दाढी दिसत आहे.

राज ठाकरे यांचे स्टाईल स्टेटमेंट

अनेक राजकीय नेत्यांची स्वतःची अशी एक ओळख असते. त्यांचे स्वतःचे ‘स्टाईल स्टेटमेंट’ पाहायला मिळते. राज ठाकरेही बहुतेक वेळा कुर्ता पायजमा अशा वेशभूषेत दिसतात. पत्रकार परिषदेत त्यांचे पांढरेशुभ्र कुर्ते पाहायला मिळतात, तर एखाद्या विशेष कार्यक्रमात त्यांचा रंगीत कुर्ता पाहायला मिळतो.

हेही वाचा : “आत्मचरित्राची पानं वाढली”, ‘एमएसईबी’ कार्यालय फोडणाऱ्या मनसैनिकाला राज ठाकरेंचा फोन

जानेवारी महिन्यात मुंबईत मनसेचे महाअधिवेशन झाले होते. त्यावेळीही राज ठाकरे यांच्या लूककडे सर्वांचे लक्ष लागले होते. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात फेब्रुवारी महिन्यात मनसेने मोर्चाचे आयोजन केलं होतं. राज ठाकरे यांनी या मोर्चासाठी पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता. तर कपाळाला भगव्या रंगाचा टिळा लावला होता. मनसेचा नवा झेंडा असलेला बॅच उजव्या हाताला बांधला होता. राज ठाकरेंनी पांढऱ्या आणि करड्या रंगाचे शूज घातले होते. मात्र या शूजच्या लेसचा रंगही भगवा होता.

(MNS Chief Raj Thackeray New Look)

Follow Us
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी