Raj Thackeray Tennis | टेनिसचा आनंद लुटताना ‘राज’स मुद्रा, राज ठाकरेंचा नवा फिटनेस फंडा

| Updated on: Oct 07, 2020 | 12:31 PM

शिवाजी पार्क जिमखान्यात दररोज संध्याकाळी हजेरी लावून राज ठाकरे सध्या लॉन टेनिस खेळाचा मनमुराद आनंद घेतात.

Raj Thackeray Tennis | टेनिसचा आनंद लुटताना राजस मुद्रा, राज ठाकरेंचा नवा फिटनेस फंडा
Follow us on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कला आणि क्रीडा प्रेम सर्वश्रुत आहे. स्वतःला तंदुरुस्त राखण्यासाठी राज ठाकरे यांनी हल्ली नियमितपणे लॉन टेनिस खेळायला सुरुवात केली आहे. टेनिसचा आनंद लुटतानाची ‘राज’स मुद्रा सोशल मीडियावर सध्या लक्षवेधी ठरत आहे. (Raj Thackeray playing Lawn Tennis at Shivaji Park Gymkhana)

‘कृष्णकुंज’वर राहणाऱ्या राज ठाकरेंसाठी शिवाजी पार्क हे जणू अंगणच. त्यामुळे शिवाजी पार्क जिमखान्यात दररोज संध्याकाळी हजेरी लावून राज ठाकरे सध्या लॉन टेनिस खेळाचा मनमुराद आनंद घेतात.

कोरोनाच्या काळात फिटनेस राखण्यासाठी त्यांनी नियमितपणे टेनिस खेळण्याचा चंग बांधला आहे. जिम व्यावसायिकांसोबत झालेल्या भेटीनंतर राज ठाकरेंनीच आपण लॉन टेनिस खेळत असल्याचं सांगितलं होतं.

राजकारणात बुद्धिबळापासून ते क्रिकेटपर्यंत सगळ्याच खेळांचा कस लागतो. पण आता लॉन टेनिस या नव्या खेळाचा ‘राज’कारणात शिरकाव होत आहे. त्यामुळे राज ठाकरे आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना आपल्या ‘बॅक हॅण्ड स्ट्रोक’मधून The ball is in your court असं तर सुचवत नसावेत ना?

राज ठाकरे यांचे स्टाईल स्टेटमेंट

अनेक राजकीय नेत्यांची स्वतःची अशी एक ओळख असते. त्यांचे स्वतःचे ‘स्टाईल स्टेटमेंट’ पाहायला मिळते. राज ठाकरेही बहुतेक वेळा क्लीन शेव करुन कुर्ता पायजमा घातलेले दिसतात. पत्रकार परिषदेत त्यांचे पांढरेशुभ्र कुर्ते पाहायला मिळतात, तर एखाद्या विशेष कार्यक्रमात त्यांचा रंगीत कुर्ता पाहायला मिळतो. मात्र, त्यातील समान गोष्ट म्हणजे त्यांची क्लीन शेव.

लॉकडाऊनमध्ये सलून बंद असताना कोणी वाढलेल्या केसांची अनोखी स्टाईल केली, तर कोणी घरच्या घरी केसांना कात्री लावली होती. कोणी दाढीला नवा आकार दिला. काही दिवसांपूर्वी गॉगल आणि टीशर्ट घातला असतानाचा राज ठाकरे यांचा फोटो समोर आला होता. राज ठाकरे यांच्या नव्या फोटोत त्यांची वाढलेली दाढी दिसत होती.

राज ठाकरे आणि टेनिस एल्बो

राज ठाकरे यांच्या उजव्या कोपराला गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात टेनिस एल्बोचा त्रास झाला होता. त्यांच्या हातावर मुंबईत उपचार करण्यात आले. त्यामुळे काही काळ राज ठाकरेंच्या हाताला बँडेजही दिसत होते. मात्र आता ‘बॅक हॅण्ड स्ट्रोक’ लगावणाऱ्या राज ठाकरेंना पाहून चाहत्यांनी निश्वास सोडला.

यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही हा त्रास झाला होता. त्यामुळे त्याला क्रिकेटपासून काही काळ दूर राहावं लागलं होतं.

टेनिस एल्बो म्हणजे काय?

कोपरापासून दंडाच्या दिशेने जोडलेले स्नायू सुजले तर मनगट उचलण्यासाठी, किंवा हालचाल करण्यासाठी वेदनादायी ठरतं. मनगटाचा वापर होणारी साधी कामं करतानाही अडचणी येतात. टेनिस किंवा बॅडमिंटन यासारखे खेळ सातत्याने खेळणाऱ्यांना हा त्रास मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. यावरुनच या दुखापतीला टेनिस एल्बो म्हटलं जातं. (Raj Thackeray playing Lawn Tennis at Shivaji Park Gymkhana)

संबंधित बातम्या :

केंद्राने POP वरील बंदी उठवावी, मूर्तिकारांचं शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला

राजसाहेब हाताला मुंग्या चावल्या का? विद्यार्थिनीच्या प्रश्नावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray | टीशर्ट-गॉगल आणि दाढी, राज ठाकरे यांचा न्यू लूक

(Raj Thackeray playing Lawn Tennis at Shivaji Park Gymkhana)