कोल्हापूरचा मंत्री वाहून कोथरूडमध्ये; चंपाची चंपी करणार : राज ठाकरे

"पुण्यात शिवसेनेचा एकही उमेदवार दिसत नाही, नाशिक, पुण्यासारख्या मोठ्या शहरात शिवसेनेला युतीत एक जागा मिळत नाही? ते लाचार झालेत. या सभेतील भाषणादरम्यान राज ठाकरेंनी शिवसेनेवर खोचक (Raj Thackeray Pune) टीका केली.

कोल्हापूरचा मंत्री वाहून कोथरूडमध्ये; चंपाची चंपी करणार : राज ठाकरे

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील बहुप्रतिक्षित सभा अखेर पार पडली. या सभेतील भाषणादरम्यान राज ठाकरेंनी शिवसेनेवर खोचक (Raj Thackeray Pune) टीका केली. “पुण्यात शिवसेनेचा एकही उमेदवार दिसत नाही. नाशिक, पुण्यासारख्या मोठ्या शहरात शिवसेनेला युतीत एक जागा मिळत नाही? ते लाचार झालेत. बाळासाहेब असते तर असं करायची कोणाची हिंमत झाली नसती. भाजपसोबत इतकी वर्ष सडली, 124 वर का अडली” असा प्रश्नही राज ठाकरेंनी (Raj Thackeray Pune) विचारला.

“कोल्हापूर-सांगलीत अनेक ठिकाणी पूरस्थिती असताना सत्ताधारी निवडणुकांच्या प्रचारात मग्न होते. कोल्हापुरात तर एवढा पूर आला की या पुरात कोल्हापूरचा मंत्री कोथरुडपर्यंत वाहत आला.” अशा शब्दात राज ठाकरेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक टीका (Raj Thackeray Pune) केली.

राज ठाकरे यांनी चंपा (चंद्रकांत पाटील) नावाचा उल्लेख केला. “पुणेकर नाव ठेवण्यात पटाईत असल्याचे त्यांनी म्हटलं. माझा मनसेचे उमेदवार अजय आहे, कारण ते चंपाची चंपी करण्यासाठी” असेही राज ठाकरे म्हणाले.

तसेच राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडियावरही टीकास्त्र सोडलं. “अमोल यादव नावाच्या एका तरुणाने विमान बनवलं. नंतर त्याने ते मुख्यमंत्र्यांना दाखवलं. त्याला आश्वासन दिलं गेलं कि ‘ठाण्यात जमीन उपलब्ध करून देतो.’ वास्तवात जमीन दिली नाही. अखेर तो मुलगा सरकारी दिरंगाईला कंटाळून अमेरिकेत गेला. हेच तुमचं ‘मेक इन महाराष्ट्र’?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित (Raj Thackeray uncut speech) केला.

“सध्या ज्या वेगात नोकऱ्या जात आहेत, ते पाहता प्रत्येक तरुणाच्या मनात एक धाकधूक आहे, ‘माझी नोकरी कधीही जाऊ शकते’. याचं कारण सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे भीषण आर्थिक मंदी आली,” असेही राज ठाकरे म्हणाले.

” ‘100 स्मार्टसिटी घडवणार अशी सरकारने घोषणा केली होती. त्याचं योजनेचे काय झालं? शहरात भरलेलं पाणी म्हणजे स्मार्ट सिटी का? वाहतूक कोंडी आणि खड्डे पडलेले रस्ते म्हणजे स्मार्ट सिटी?,” असा प्रश्नही राज ठाकरेंनी (Raj Thackeray uncut speech) विचारला.

ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप लावले तेच आज भाजपात गेले. काँग्रेसचा विरोधी पक्षनेताही भाजपात गेला. म्हणजे इथूनही त्यांचं राज्य आणि तिथूनही त्यांचं राज्य. ही तुमच्याशी केलेली प्रतारणा नाही का? अशा शब्दात त्यांनी काँग्रेसलाही टोला लगावलाय

“आम्हाला विरोधासाठी विरोध करणारा ‘विरोधी पक्ष’ व्हायचं नाही. सरकारने एखादं चांगलं काम केलं तर खुल्या मनाने अभिनंदन करू, पण जनतेवर अन्याय करायचा प्रयत्न झाला तर निडरपणाने सरकारला धारेवर धरू”, असेही राज ठाकरे पुण्यातील भाषणादरम्यान म्हणाले.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI