Raj Thackeray : मनसेनं सोळा वर्षात काय कमावलं? राज ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं

| Updated on: Mar 09, 2022 | 9:41 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) वर्धापन दिन सोहळा पुण्यात (Pune) पार पडला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यावेळी मनसे सैनिकांना मार्गदर्शन केलं.

Raj Thackeray : मनसेनं सोळा वर्षात काय कमावलं? राज ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं
मनसेनं 16 वर्षात काय कमावलं राज ठाकरे यांनी सांगितलं
Image Credit source: Tv9 Marathi
Follow us on

पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) वर्धापन दिन सोहळा पुण्यात (Pune) पार पडला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यावेळी मनसे सैनिकांना मार्गदर्शन केलं. मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा वर्धापन दिन सोहळा मुंबईबाहेर आयोजित करण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांनी 16 वर्षात मनसेनं काय कमावलं यासंदर्भात वक्तव्य केलं. आपल्या पक्षाचं जनसंपर्क कार्यालय नसून देखील लोक एखादी समस्या असली की ती सोडवण्यासाठी सरकारकडे जात नाहीत. ते मनसेकडे येतात, असं राज ठाकरे म्हणाले. 16 वर्षातील आपली कमाई असल्याचं राज ठाकरे म्हणाले. लोक आपल्याकडे विश्वासाने येतात. संपर्क कार्यालय नसताना येतात ती आपली सोळा वर्षातली कमाई आहे, असे राज ठाकरेंनी म्हटलं.

जनसंपर्क कार्यालय काढतात आणि एकटं बसतात

राज ठाकरेंनी राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही आम्हाला संपवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं म्हणतात. मग राहिलं कोण मनसेचं असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. या लोकांना जे लोक मत देतात ना आभार माना त्यांचे त्यातले एकही लोक त्यांच काम घेऊन त्यांच्याकडे जात नाहीत. नुसत संपर्क कार्यालय सुरु करतात आणि त्या कार्यालयात एकटं बसतात, असं राज ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंवर निशाणा

‘निवडणुका लांबणीवर पडणार हे मी नोव्हेंबरमध्ये सांगितलं होतं. निवडणूक आली की निवडणूक चढायला लागते. आता तुम्हाला बरोबर ते कळलं असेल. वातावरणात निवडणूक यायला लागते. मला ती वातावरणात दिसेना. आमच्या ओबीसी समाजाचं कारण पुढे केलं… सगळं खोटं. यांना निवडणूक घ्यायचीच नव्हती. मला कुणाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत, दुखण्याबाबत बोलायचं नाही. मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नाही, पण मला त्याबाबत काही बोलायचं नाही. पण खरं कारण ते आहे. तीन महिने निवडणुका पुढे म्हणजे जून, धो धो पाऊस.. सामान्यांना निवडणुकांचं काही देणं घेणं नाही. निवडणुका फक्त उभं राहणाऱ्यांसाठी महत्वाच्या आहेत. साला आपली कापली जाते की राहते, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.

इतर बातम्या:

Raj Thackeray : ‘संजय राऊत… कॅमेरा आला की सुरु, कॅमेरा हटला की नॉर्मल’, राऊतांची नक्कल करत राज ठाकरेंची टोलेबाजी

Video : ‘अहो तेव्हा व्हायची लग्न! तुमचं अजून नाही झालं’ राज्यपालांना राज ठाकरेंनी सुनावलं