AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : ‘अहो तेव्हा व्हायची लग्न! तुमचं अजून नाही झालं’ राज्यपालांना राज ठाकरेंनी सुनावलं

गेल्या काही दिवसातल्या राज्यपालांच्य (Governor Bhagat Singh Koshyari) वादग्रस्त वक्तव्यांवरून राज ठाकरे राज्यपालांवर मान्सुनातला पाऊस बरसावा तसे बरसले आहेत.

Video : 'अहो तेव्हा व्हायची लग्न! तुमचं अजून नाही झालं' राज्यपालांना राज ठाकरेंनी सुनावलं
राज्यपालांच्या लग्नावरून राज ठाकरेंच्या कोपरखिळ्याImage Credit source: tv9
| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Mar 09, 2022 | 9:09 PM
Share

पुणे : आज मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे (Raj thackeray Speech) राज्यपालांना टार्गेट करताना दिसून आले. गेल्या काही दिवसातल्या राज्यपालांच्य (Governor Bhagat Singh Koshyari) वादग्रस्त वक्तव्यांवरून राज ठाकरे राज्यपालांवर मान्सुनातला पाऊस बरसावा तसे बरसले आहेत. त्यांनी राज्यपालांच्या ब्रम्हचार्याचाही खरपूस समचार घेतलाय. राज्यपालांनी एका कार्यक्रमात बोलताना, सावित्रिबाई फुले (Savitribai Phule) आणि महात्मा फुले यांच्या लग्नातील वयावरून वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून राज ठाकरे आज राज्यपालांवर तुटून पडताना दिसून आले. तर छत्रपती शिवाजी महाजारांबाबत राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरही ते बरसले आहेत. आमच्याच महापुरुषांना बदनाम करायचं आणि माती फिरवून मतं मिळवायची. एवढाच उद्योग सुरु आहे. परवादिवशी भाषणात कुणीतरी मला दाखवलं, जोतिबा आणि सावित्राबाईंबद्दल बोलतो, नक्कल करुन दाखवतो. अहो तेव्हा व्हायची लग्न.. तुमचं अजून नाही झालं. सालं नको तिथं बोटं घालायची सवय यांना, असे म्हणत राज्यपालांच्या त्याही वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

महापुरूषांबद्दल काहीही बोलत सुटतात

तुम्हाला काही माहितीये का? महापुरुषांबद्दल माहितीये का? आपला अभ्यास, संबंध नसताना नुसतं बोलून जायचं. रामदास स्वामींनी काय लिहीलेय, छत्रपतींनी काय लिहीलंय ते माझ्या घरात लावलंय मी. शिवछत्रपतींबद्दल जे लिहिलंय शिवछत्रपतींबद्दल इतकं चांगलं लिहिलेलं मी वाचलेलं नाही. वाचा ते निश्चयाचा महामेरू…कोण श्रीमंतयोगी…असे म्हणत त्यांनी राज्यपालांचा समाचार घेतालाय. तसेच आमच्याकडे योगी सापडतच नाही. धाड पडली ना ईडीची की कळतं श्रीमंतय, अशी कोपरखिळीही त्यांनी मारली आहे. एका कार्यक्रमात बोलताना रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाजांबद्दल राज्यपलांनी वादग्रस्त विधान केले होते. रामदास स्वामी गुरू म्हणून नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांना कुणी विराचले नसते या राज्यपालांच्या विधानावरून राज ठाकरे भडकले होते.

निवडणुकांसाठी राजकारण सुरू

यानंतर कोंबड्या लागल्या झुंजायला, मग आता दोन दिवसांनंतर कळलं, निवडणुका होत नाही, मग सगळे पुन्हा शांत, असे म्हणत त्यांनी राजकीय पक्षांचाही समाचार घेतला आहे. तसेच निवडणुका लांबणीवर पडणार हे नोव्हेंबरपासून सांगत होतो. मला वाटत नाही निवडणुका मार्चमध्ये होतील. मी काही पत्रकारांशीही बोललो होतो, निवडणूक आली ना की ती चढायला लागते. आता बरोबर कळला तुम्हाला निवडणुकीचा अर्थ, साला चढायला लागते म्हणजे काय? तर अशी ती स्पर्श करते. वातावरणात निवडणूक यायला लागते. मला वातावरणात निवडणूकच दिसेना, असेही ते म्हणाले आहेत.

Raj Thackeray : महापालिका निवडणुका पुढे का ढकलल्या? राज ठाकरेंनी सांगितलं कारण; मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Video : राज्यपालांना शिवराय कळलेत का? राज्यपालांची नक्कल करत राज ठाकरेंनी घेतला समाचार

चुंबन, चॅटिंग आणि लॉज, पडळकरांनी काढली पोलिसांची प्रकरणं, नेमके आरोप काय?

Follow Us
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा