AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चुंबन, चॅटिंग आणि लॉज, पडळकरांनी काढली पोलिसांची प्रकरणं, नेमके आरोप काय?

आज सर्वात लक्षवेधी भाषण ठरलं ते भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचं (Gopichand Padalkar) . कारण त्यांनी पोलिसांवर (Pune Police Crime) अनेक गंभीर आरोप केले आहेत.

चुंबन, चॅटिंग आणि लॉज, पडळकरांनी काढली पोलिसांची प्रकरणं, नेमके आरोप काय?
पडळकरांनी पोलिसांची प्रकरणं काढलीImage Credit source: tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Mar 09, 2022 | 4:53 PM
Share

मुंबई :  विधिमंडळाच्या अधिवेशनात (Assembly Session)  आज सर्वात लक्षवेधी भाषण ठरलं ते भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचं (Gopichand Padalkar) . कारण त्यांनी पोलिसांवर (Pune Police Crime) अनेक गंभीर आरोप केले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्र अत्यंत खालच्या थराला गेले आहे. हे राज्याने पाहिले आहे.असे म्हणत त्यांनी हल्लाबोल चढवला आहे. बारामतीतला शिंदे नावाचा एक पोलीस निरीक्षक एका तरूणीला घेऊन लॉजवर जातो. लॉजवर गेल्यावर ती तरूणी त्याचे चित्रिकरण करते. ते चित्रिकण सोशल मीडियावर व्हायरल होतं. त्यानंतर त्याची बदली नेते करतात. मग त्याच्यावर गुन्हा का दाखल होत नाही? आणि त्याने गुन्हा नसेल केला तर त्याची तडकाफडकी बदली का केली? आणि बदली केली तर गुन्हा का दाखल होत नाही? असे सावल करत पडळकरांनी गृहविभाग आणि पोलीस खात्याला घेरलं. कोण त्याला पाठिशी घालतंय? कशासाठी पाठिशी घालतंय? याचे उत्तर गृहमंत्र्यांनी जनतेला द्यावे, असे म्हणत त्यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे.

पडळकरांनी सांगितला चुंबन आणि धमकीचा किस्सा

एवढा एकच नाही तर पडळकरांनी सरकारी कार्यालयातला दुसराही एक किस्ता सांगितला आहे. एक मुलगी सरकारी कार्यालयात टेबलावर बसली आहे. एक माणून येतो तिचे चुंबन घेतो आणि पळून जातो. ती मुलगी पाठिमागे पळतेय शिव्या देत. मात्र अजूनही त्याचा तपास झाला नाही. त्याच्यात गुन्हा दाखल झाला नाही. त्याचे सीसीटीव्ही फुटेज आले आहे. मात्र तरीही कुणतरी म्हणतं तो तिथं कायतर चोरी करायला गेला असेल. अशी उत्तरं देता? असे म्हणत त्यांनी हल्लाबोल चढवला. तसेच एका पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेलेल्या महिलेला तिच्या नवऱ्यापासून तोडल्याचा आणि तिच्या नवऱ्याला धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

पोलिसांवर गंभीर आरोप

दौडमध्ये डीवायएसपीच्या विरोधात एका महिलने विनयभंगाची तक्रार केली. तेव्हा एसपीने सांगितलं सेटलमेंट करा. ती महिला अधिवेशनावेळी अंगावर रॉकेल ओतून घेते ही अवस्था कायदा आणि सुव्यवस्थेची झाली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे. यात पुण्यातले एसपी पुढाकार घेत आहेत. हा माणूस कार्यालयातून बाहेरच पडत नाही. मी यांचे सर्व्हिस रेकॉर्ड बघितले. हा माणूस पोलिसांचा शत्रू आहे. एका कॉन्स्टेबल महिलेने पोलीस निरीक्षकाविरोधात लेखी तक्रार दिली. हा लैंगिक अत्याचार करतो, हा जातिवाचक शिव्या देतो. याविरोधात तिने धाव घेतली. मात्र अजूनही त्यात तक्रार दाखल झाली नाही. अशी प्रकरणं काढत पडळकरांनी गृहखात्याचे वाभाडे काढले आहेत.

पवारांवर नाव न घेता निशाणा

एक सरकारी वकील आणि नेते विरोधी पक्षनेते संपवायला कारस्थान रचत आहेत. त्यांचे चेहरे आता समोर आले आहेत. ज्यांचा राजकीय उदय पाठीत खजीर खूपसून झालाय. ज्यांची राजकीय कारकिर्द पूर्ण रक्तबंबाळ आहे, असे म्हणत पडळकरांनी नाव न घेता पवारांवर निशाणा साधला आहे. आता राम नाम सत्य व्हायची वेळ आली असताना ज्यांच्या असे धंदे पुढे आले आहेत. त्यांच्यावरचे आरोप खरे ठरले आहेत. असा टोला त्यांनी लगावला. मात्र फडणवीसांना संपवणे सोपे नाही. त्यांनी केलेले काम लोकांसमोर आहे. फडणवीसांचे नाव ऐकूनच यांना कापरं भरतंय. त्यामुळे हे असे पाठीत वार करत आहेत. मात्र याचा काहीही उपयोग होणार नाही, असेही पडळकर म्हणाले.

दुसऱ्याच्या बायकोच्या हातावर पोलीस अधिकाऱ्याचा टॅटू, महिलांच्या सुरक्षेवरून पडळकरांनी काढले वाभाडे

उद्धवजी, तुमचं-आमचं नसेल जमत ते सोडून द्या, पण एक दिवस बाळासाहेबांना उत्तर द्यावं लागेल: देवेंद्र फडणवीस

गावा-गावात संघर्ष करू, रस्त्यावर उतरू, तुम्हाला फिरणं मुश्कील करून टाकू, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा इशारा

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?